राष्ट्रीय अंतरिक्ष दिन आरडीजी पब्लिक स्कूल अकोला येथे साजरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2026, 1:53 PM
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात अशा उपक्रमांचा फायदा होईल - प्रमोद टेकाडे उपशिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद अकोला, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर नागपूर, शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद अकोला, अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, कुतूहल संस्कार केंद्र ,अकोला, आर डी जी पब्लिक स्कूल अकोला यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंतरिक्ष दिन आर डी जी पब्लिक स्कूल अकोला येथे साजरा करण्यात आला. अंतरिक्ष दिनाचे औचित्य साधून शिक्षणाधिकारी (माध्य) श्री अरविंद मोहरे ,जिल्हा परिषद अकोला यांचे सूचनेनुसार आणि कुतूहल संस्कार केंद्र व इस्रोचे एज्युकेटर डॉ. नितीन ओक , अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भास्कर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळेतील वर्ग 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी लेखी 40 गुणांची परीक्षा व प्रश्नमंजुषा घेण्यात आली त्यामध्ये सहाशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामधून सोळा विद्यार्थी प्रश्नमंजुषेसाठी निवडण्यात आले. अतिशय महत्त्वाची प्रश्नमंजुषा झाल्यानंतर त्यातील प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो सायन्स सेंटर तसेच विक्रम साराभाई अणूविज्ञान केंद्र येथे अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येईल. प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम क्रमांक कोठारी कॉन्व्हेंट चे अथर्व बाहेती व साई भावनेर, द्वितीय क्रमांक जुबली इंग्लिश हायस्कूल चे नीरज ढोरे व नकुल दोड, तृतीय क्रमांक बाल शिवाजी स्कूलचे श्रेयश पाठक व वरद कुलकर्णी तसेच उत्तेजनार्थ प्रथम सेंट एनस स्कूल चे लक्ष दालमिया व लक्ष सुरेखा आणि उत्तेजनार्थ द्वितीय स्कूल ऑफ स्कॉलरचे संस्कृती खैरे व प्रेरणा बेहरा या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.अंतरिक्ष दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरडीजी पब्लिक स्कूलचे कोरियांचन सी. पी. प्राचार्य आर डी जी पब्लिक स्कूल अकोला उद्घाटक श्री सुभाष भालेराव उपशिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद अकोला , उपप्राचार्य श्वेता चौमवाल तसेच ज्यांच्या संकल्पनेतून प्रश्नमंजुषा व परीक्षा देण्यात आली असे डॉ. नितीन ओक व डॉ. रवींद्र भास्कर उपस्थित होते.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या वैशिष्ट्यामधील हा एक उपक्रम असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यात प्रश्नमंजुषा आणि ही परीक्षा महत्त्वाची ठरते. असे प्रतिपादन श्री प्रमोदजी टेकाडे उपशिक्षणाधिकारी (माध्य) यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यावेळेस विविध शाळांमधील सर्व सहाशे विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते. प्रश्नमंजुषा झाल्यानंतर समारोपीय कार्यक्रमात प्रमोदजी टेकाडे उपशिक्षणाधिकारी (माध्य) यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निर्मला विलासराव घुंगड व विलास घुंगड तालुकाध्यक्ष विज्ञान अध्यापक मंडळ तेल्हारा यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव मुरलीधर थोरात तसेच तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विजय पजई , ओ रा चक्रे ,प्रभू चव्हाण तसेच आरडीजी पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
Post Views: 8