लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून दोन समाजशील व्यक्तिमत्त्वांचा सन्मान


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-05-05
   

अकोला -   लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयबापू देशमुख व केंद्रीय उपाध्यक्ष प्रदीपजी खाडे या अकोल्यातील दोन समाजसेवी व्यक्तिमत्त्वांचा वाढदिवस होता. त्या जन्मदिनाच्या निमित्ताने दोघांचाही यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
      ज्येष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सन्मान व सत्कार सोहळ्याला प्रा. राजाभाऊ देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीवबाप्पू देशमुख, प्रा. संतोषजी हुशे,  सिद्धेश्वर देशमुख, एडवोकेट राजेश जाधव, गजानन हरणे, भानुदास कराळे, राजेंद्र देशमुख, किशोर मानकर, लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर,दिपक देशपांडे  आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संजयबापू देशमुख व प्रदीप खाडे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वरबापू देशमुख यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या कार्य व कर्तृत्वाबाबत सविस्तर माहिती दिली. भानुदासजी कराळे व उपस्थित मान्यवरांनी दोन्ही सत्कारमूर्तींबाबत मनोगत व्यक्त केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना संजयबापू देशमुख व प्रदीप खाडे यांनी काही अनुभव विषद करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज देशमुख तर आभारप्रदर्शन राजेन्द्र यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बॕंकेचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत उकंडे,अॕड.नितीन धूत,गजाननराव देशमुख आंबोडेकर,बाळासाहेब देशमुख,मानवधर्म नागरी सहकारी पतससंस्थेचे संचालक दिपक झाडे,देवीदास घोरळ, प्रा.विजय काटे,नरेन्द्र डंबाळे,अंबादास तल्हार,मोहन शेळके, निशाली पंचगाम, अशोककुमार पंड्या,संदिप देशमुख,सुरेशजी कुलकर्णी,सागर लोडम,प्रताप देशमुख,गुरूदेव सेवा मंडळाचे भानुदास कराळे,दिपक आखरे,काशिराम लोखंडे,रविबाप्पू देशमुख,मनोहर मोहोड, मंगेश चराटे, राहूल राऊत,संदीप देशमुख, पंकज देशमुख, शंकर जोगी,प्रा.मंदार देशमुख, देशमुख समाज जागृती मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे सर्व पदाधिकारी,सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शुभेच्छा देऊन दोन्ही सत्कारमूर्ती यांचा सत्कार केला.

    Post Views:  256


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व