एल.आर.टी. च्या कोमल मेश्राम चा आर्मी अटॅचमेंट कॅम्प पुणे येथे सहभाग


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Sep 2025, 9:27 AM
   

पुणे : येथील १५ मराठा लाईट इन्फंट्री, औंध मिलिटरी कॅम्प द मराठा रेजिमेंट, लाईट इन्फंट्री ब्रिगेड यांच्या वतीने दिनांक २६ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर या कालावधीत आर्मी अटॅचमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जितीन थोमस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या शिबिरात संपूर्ण अमरावती ग्रुप मधून ४९ कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. राज्यातील विविध बटालियनमधील निवडक व उत्कृष्ट कॅडेट्सना या शिबिरात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. या कॅम्पसाठी ११ महाराष्ट्र बटालियन मधून एकूण ०९ कॅडेट्सने सहभाग घेतला यामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील ज्युनिअर अंडर ऑफिसर कोमल राजू मेश्राम हीची निवड करण्यात आली होती. हिने या शिबिरामध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवत महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. या कॅम्पमध्ये सहभागी कॅडेट्सला लष्करी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले गेले. यात शस्त्र हाताळणी, जटिल कवायती, नकाशा वाचन, तणाव व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या लष्करी कौशल्यांचा समावेश होता. तसेच रायफल आणि लाइट मशीनगनचे प्रशिक्षणही अत्यंत काटेकोरपणे देण्यात आले. ज्युनिअर अंडर ऑफिसर कोमल राजू मेश्राम हिने या शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या नेतृत्वगुणांचा आणि शिस्तबद्धतेचा ठसा याठिकाणी उमटवला. कोमलच्या यशस्वी सहभागाबद्दल महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे, व्यवस्थापन अभ्यासक्रम समन्वयक डॉ. वर्षा सुखदेवे व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. त्याचप्रमाणे बी.जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजीतजी परांजपे, सहसचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा यांच्यासह कार्यकारी सदस्यांनीही तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    Post Views:  148


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व