स्वतंत्र दिनाचे निमित्त आधार फाउंडेशन च्या वतीने सर्पमित्रांना स्टिक भेट
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Aug 2023, 8:44 PM
अकोला :- प्रभाग क्रमांक 4 मधील न्यू तापडिया नगर, खरप या भागामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सापांना पकडून त्यांना जीवदान देऊन येथील नागरिकांना भयमुक्त करणारे सर्पमित्र तुषार उगवेकर व विशाल पोतराज यांना आधार फाउंडेशन च्या वतीने स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून साप पकडण्याकरिता लागणाऱ्या स्टिक भेट म्हणून दिल्या.
न्यू तापडिया नगर व खरप या भागामध्ये काळी माती असल्याने या भागात अनेक घोणस, मण्यार व नाग यासारखे विषारी साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात या सापांना नागरिकांच्या घरातून पकडून त्यांना जीवदान देऊन व या नागरिकांना भयमुक्त करण्याचे काम तुषार उगवेकर विशाल पोतराज आणि गणेश मिश्रा हे युवक करत असतात. परंतु नागरिकांची सुरक्षा करत असताना हे युवक देखील सुरक्षित असले पाहिजे या ही बाब माणिक शेळके यांनी लक्षात घेऊन सदैव सामाजिक क्षेत्रात तत्पर असणाऱ्या आधार फाउंडेशन कडून या युवकांसाठी खास उच्च दर्जाच्या साप पकडण्यासाठीच्या स्टिक भेट म्हणून देण्यात आल्या यावेळी आधार फाउंडेशन चे अध्यक्ष माणिक शेळके, राहुल ठाकूर, गौरव पांडे, केवल ठाकूर, सुमित ठाकरे, सुशील ठाकरे, समर्थ कराळे, तेजस पवार, मंगल इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 124