प्रभात किड्सच्या यज्ञ कुंड नाटकाने पटकावीला बाल नाट्य स्पर्धेचा विश्वास करंडक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Dec 2024, 10:18 AM
   

*मला पण बालपण हवय ला द्वितीय  *जगाओ मेरे देशको "ला तृतीय  पुरस्कार 
जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार यांचे उपस्थितीत सोहळा संपन्न 
अकोला..... मागील चार दिवसा पासून सुरु असलेल्या विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेचा निकाल आज   घोषित करण्यात आला. त्यात प्रभात किड्स स्कुल अकोला च्या बालकांनी सादर केलेल्या  यज्ञ कुंड  नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून विश्वास करंडक पटकाविला आर डी जी पब्लिक स्कूल अकोला च्या मला पण बालपण हवय" या नाटकाने द्वितीय क्रमांक, तर एज्युविला पब्लिक स्कूल पातूरच्या जगाओ मेरा देश या नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला.
 जिल्हाधिकारी अजित कुंभार या सोहळ्यास उपस्थित होते. त्यांचे हस्ते दीप प्रज्वलित करून  सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महोत्सवाचे अध्यक्ष प्राध्यापक मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे तसेच या स्पर्धेचे परीक्षक धनंजय देशपांडे यतीन माजिरे उपस्थित होते.
              जिल्हाधिकारी अजित कुंभार याप्रसंगी आपल्या भाषणात म्हणाले की, बालकांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ही विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धा केवळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे. व त्या माध्यमातून अनेक चांगले बालकलावंत  तयार होऊन त्यांनी राज्यात व देश पातळीवर आपले नाव उज्वल केले पाहिजे. येत्या तीन ते सहा महिन्यात अकोल्यातील नवीन नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यात येईल तसेच नाट्य प्रशिक्षणाकरिता शिक्षकांना आर्थिक मदत करण्यात येईल असेही याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले. स्पर्धेचे परीक्षक धनंजय सरदेशपांडे व निमंत्रक प्रशांत गावंडे, यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
                     या स्पर्धेत अतिथींच्या हस्ते विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. नवीन संहिते करिता  उत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार सॉरी नाटकाकरिता कांचन पटोकार यांना देण्यात आला. उत्कृष्ट नेपत्याकरिता प्रथम पारितोषिक जगावो मेरा देश  च्या केशव चोपडेकर यांना, द्वितीय पारितोषिक दिव्यांगो का संघर्ष  या नाटकासाठी समीक्षा मोहोकार व तमन्ना अग्रवाल यांना देण्यात आला. तृतीय पारितोषिक योजना बाईचा विकास या नाटकाकरिता राजवीर दुर्गे यांना देण्यात आला. उत्कृष्ट संगीताचे प्रथम पारितोषिक पंकज खराबे, द्वितीय पारितोषिक नेहांशू ठाकरे तर तृतीय पारितोषिक नंदकिशोर डंबाळे यांना देण्यात आले. उत्कृष्ट प्रकाश योजने करिता प्रथम पारितोषिक  सचिन जाधव यांना, द्वितीय पारितोषिक विनोद भालतिलक तर तृतीय पारितोषिक हर्षल ससाने यांना देण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषेकरीता ठेवण्यात आलेले प्रथम पारितोषिक यज्ञ कुंड नाटकाच्या दिनेश पाटील व मुक्ता धुमाळे यांना, द्वितीय पारितोषिक प्रणाली हात वळणे, स्नेहल बिडकर, किरण कोगदे व ज्योती तिवारी  यांना तर तृतीय पारितोषिक अर्पिता भगत, व महेश वाडेकर यांना देण्यात आले.
                   मुलांकरता ठेवण्यात आलेल्या उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक रुद्र कुकडकर यास, द्वितीय पारितोषिक सुजय पिसे तर तृतीय पारितोषिक सोहम पंडित कर यास देण्यात आले. मुलींकरिता ठेवण्यात आलेले उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक  अनया कुऱ्हे, द्वितीय पारितोषिक आराध्या चिंचोळकर तर तृतीय पारितोषिक अष्टिका ठाकरे हिला देण्यात आले. सादरीकरणासाठी ठेवण्यात आलेले उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक  चम चम चमको या नाटकास तर द्वितीय पारितोषिक असं कसं या नाटकास देण्यात आले.
                 उत्तेजनार्थ पारितोषिक  ओजस्वी कडू, सक्षम पांडव, तनवी काकड, ओवी चिने, अर्णव काळे, स्नेहल ताले, प्रणिता जाधव, अनुष्का देशपांडे, आराध्या डांगे, काव्या खंबाळकर, प्रांजल गावंडे, सार्थक घाटे, अनुष्का काळे, अनाम साजिद कमानी, मोहित वाठुरकर, किंजल फाफेरीया, समिधा काकड, किंजल पालखेडे, रुद्र जानो कार, जानवी मस्के, धनश्री पांडे, अर्णव केने, अर्णव गाडगे, श्रद्धा जिरापुरे, इच्छा एडणे व परी गुप्ता  यांना देण्यात आले. कार्यक्रमास महोत्सवाचे अध्यक्ष प्राध्यापक मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, अशोक ढेरे, सुनील गजरे, अरुण घाटोळ, अविनाश पाटील, रवी अरबट, अनिल कुलकर्णी, प्राचार्य प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, विष्णू निंबाळकर, प्रदीप अवचार, सय्यद वासिफ, रितेश महल्ले, अंकुश इंगळे यांचे सह पालक वर्ग विविध शाळांमधील फार मोठ्या संख्येत  उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अक्षय राऊत यांनी केले.

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व