घरफोड्या करणाऱ्या टोळीतील एकाला नागरिकांनी सीताफिने पकडले !


बार्शीटाकळी पोलिसांच्या केले स्वाधीन
 विश्वप्रभात  18 Mar 2024, 9:29 PM
   

अकोला : घरफोड्या करण्यासाठी लागणारे घातक शस्त्र हातात घेऊन कानेरी सरप येथे हैदोस घालणाऱ्या टोळीतील एका सदस्याला गावकऱ्यांनी मोठ्या सीताफिने पकडून बार्शीटाकडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सहापैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात आला असला तरी अद्याप पाच चोरटे फरारच आहेत. 
    पुणे जवळच्या दौंड तालुक्यातील ही चोरट्यांची टोळी अकोला जिल्ह्यात दाखल झाली होती तालुक्यातील कान्हेरी सरप येथील काही घरांना त्यांनी लक्ष केले होते १७ मार्च रोजी रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास कान्हेरी सरप येथील चार पाच घरे त्यांनी फोडली मात्र  घरमालक हे वेगवेगळ्या कारणाने बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे हाती मोठा मुद्देमाल लागला नसला तरी त्यांनी आठ ते दहा कुलपे तोडली आणि ही हालचाल लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी एका  चोरट्याला गावकऱ्यांनी सीताफिने पकडले. त्याची धुलाई करून त्याला  पोलिसांच्या स्वाधीन केले १७ मार्च रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला .यावेळी नागरिकांनी पकडलेला भरतगाव येथील रहिवासी प्रीतीराज शाम नानवत (२८) असे या चोरट्याचे  नाव आहे .तर त्याने पोलिसांकळे घरफोडीची कबुली देऊन काही शस्त्र व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या संदर्भात गोपाळ पंढरी सरप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी  पोलिसांनी भादविच्या कलम ४५७ ३८० ,५११ अन्वय गुन्हा दाखल केला आहे. 
चौकट
.... दरोड्याचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित
कान्हेरी सरप येथे सशस्त्र चोरट्यांनी अक्षरशा हैदोस घातला त्यांची संख्या पाच ते सहा एवढी होती स्थानिक नागरिकांच्या सतरतेने संभाव्य गुन्हा ठरला असला तरी पाच ते सहा घरे फोडणाऱ्या या चोट्याच्या टोळीने तालुक्यात दहशत पसरवली आहे. त्यापैकी एक जण नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला .मात्र  बार्शीटाकळी पोलिसांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. असे न करता पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असल्याचे कान्हेरी सरप वाशीयांचे यांचे म्हणणे आहे. 

    Post Views:  375


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व