कुणबी समाज युवक-युवती परीचय मेळावा व सोयरिक पुस्तिका प्रकाशन समारंभ संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Dec 2024, 10:31 AM
(मनोज भगत) हिवरखेड - अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोलाच्या वतीने उपवर युवक- युवती परीचय मेळावा व सोयरीक पुस्तिका प्रकाशन समारंभ रविवार दि.८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. आबासाहेब खेडकर सभागृह रामदास पेठ, पोलीस स्टेशन समोर अकोला येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोलाचे जिल्हाध्यक्ष श्री अनिल श्रीधरराव गावंडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून चांगेफळ येथील श्री.ह.भ.प. गुरुवर्य स्वामी रामभारतीजी महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शुकदास महाराज गाडेकर, माजी आ. ज्ञानदेवराव ठाकरे, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, जेष्ठ समाजसेवक विश्वनाथजी तिडके सोनाळा, जि.प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर(ठाकरे गट), पं. स. अकोट सभापती हरिदिनी वाघोडे,अ.भा. कुणबी समाज बहू. मंडळाचे माजी अध्यक्ष वामनराव मानकर,अ.भा. कुणबी समाज बहू.मंडळाचे माजी अध्यक्ष महादेवराव कौसल,कुणबी समाज मंडळ खामगाव अध्यक्ष गजाननराव ढोरे,मा.अध्यक्ष राजाराम काळणे खामगांव,शेगाव कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष दयाराम वानखडे, रामदासजी महाले,कुणबी समाज मंडळ नांदुरा विजयजी डवंगे, कामगार नेते नागपुर अनंतराव भरसाकळे विदर्भ कुणबी समाज मंडळ पुणे अध्यक्ष चांगदेवराव कळसकार, संजयजी वडतकर, सौ.दिपाली धनोकर पुणे,कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ उमरी-अकोला अध्यक्ष गजानन थोरात, श्री. संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ अकोला अध्यक्ष सुभाष दातकर,अ.भा.कुणबी समाज युवा मंच अकोलाचे अध्यक्ष माणिकराव शेळके, सर्वश्री.जि.प.सदस्य गजानन काकड, अनंत अवचार, राम गव्हाणकर, जि. प. सदस्य प्रकाश आतकड, माजी जी. प अध्यक्ष संध्याताई वाघोडे शोभाताई शेळके पं.स.अकोट उपसभापती संतोष शिवरकार, माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, वंचीत बुलढाणा प्रभारी अध्यक्ष प्रदीप वानखडे, अकोट कृ.उ. बाजार समिती उपसभापती अतुल खोटरे, माजी प.स.सदस्य श्री वासुदेवराव टिकार,श्री.गजानन दांदले उपस्थित होते.सुरवातीला संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानतंर सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजभाऊ आढे यांनी केले त्यांनी मंडळ करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.त्यानतंर सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर ह.भ.प.श्री रामभारती महाराज यांनी मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात त्यांनी संत तुकाराम महाराजांचे विचार अतिशय पुरोगामी असून समाजाची प्रगती करणारे आहेत.त्यामुळे सर्व समाजाने तुकाराम महाराजांच्या विचारांचे पालन करावे.गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करावे, गोरगरिबांच्या दुःखात सहभागी व्हावे, गरीब समाज बांधवांच्या मुला मुलींचे लग्न लावून द्यावे, त्यांना सहकार्य करावे असे सांगितले. त्यानंतर ह.भ.प.शुकदास महाराज गाडेकर यांनी कुणबी समाज मंडळाचे उपक्रम अतिशय चांगले असून समाज उपयोगी आहेत आपण सर्व समाजबांधवांनी त्यांना नेहमी सहकार्य करावे असे सांगितले.
त्यानंतर अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री रामेश्वरभाऊ फुंडकर यांनी मनोगत व्यक्त केले व मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची स्तुती केली. त्यानंतर उपवर युवक-युवतींनी व्यासपीठावरून आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल गावंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाज बांधव सामजिक उपक्रमात नेहमी सहकार्य करीत असतात, सर्व बांधवांनी आम्हाला सोयरिक पुस्तिका तयार करण्यात करीता भरपूर सहकार्य केले असेच सहकार्य भविष्यात करावे असे असे सांगून सोयरीक पुस्तकेत ज्यांनी जाहिराती दिल्या, युवक व युवतींचे परिचय पत्र दिले, त्या सर्व बांधवांचे व ज्यांनी ज्यांनी कळत नकळत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच 200 च्यावर उपवर युवक-युवती यांनी आपला परिचय दिला. या समाज मेळाव्या करीता उपस्थित सर्व समाज बांधवांना शासकीय कंत्राटदार श्री राजू भाऊ फाटे यांनी अन्नदान केले तसेच गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यक्रमासाठी अन्नदान करत आहेत त्यांचा सुद्धा या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या याप्रसंगी गजानन हॉस्पिटल कौलखेड चे संचालक डॉ.श्री अंकुश कराळे व डॉ.सौ. प्रीती कराळे यांच्या तर्फे 400 समाज बांधवांची मोफत ब्लड शुगर तपासणी करण्यात आली. यासाठी श्रीकृष्ण भटकर व किरण अढाव यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पद्मावती कोल्हे, श्री प्रकाश हरणे, श्री रविकरण हेलगे, श्री गजानन लासुरकर यांनी केले तर सर्वांचे रीतसर आभार मंडळाचे सचिव डॉ. गजानन वाघोडे यांनी मानले. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
Post Views: 148