मनोज जरांगे पाटील यांची चरणगाव येथे विदर्भातील पहिली विराट सभा होणार


सभा आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Nov 2023, 9:33 AM
   

चरणगाव येथे मराठा आरक्षण संदर्भात आज 24 व्या दिवशी उपोषणाची धग कायम
नेत्यांनी दुर्लक्ष केले तर निवडणुकीमध्ये भोगावे लागतील गंभीर परिणाम - गजानन हरणे
अकोला : मराठा आरक्षणाकरिता मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ गेल्या 24 दिवसापासून पातुर तालुक्यातील चरणगाव येथे गावातील मराठा कार्यकर्त्यांचे ऐतिहासिक असे सातत्याने उपोषण सुरू आहे 
या उपोषणाची धग कायम असुन आज 21 नोव्हेंबर 2023 रोजी  सुरू असून विदर्भात एकमेव हे आंदोलन कटाक्षाने सुरू असल्याने या ठिकाणी अनेक मराठा नेते येऊन  आंदोलनाला पाठिंबा देत आहेत 
20 नोव्हेंबर 2023 रोजी सुद्धा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक  गजानन हरणे, अखिल भारतीय छावा क्रांती सेनेचे  प्रदेश उपाध्यक्ष दादाराव पाथरीकर, निर्भय बनो जन आंदोलनाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद धर्माळे, शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा निरीक्षक यशवंत दांडगे यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे.यावेळी समाजसेवक मराठा योद्धा गजानन हरणे यांनी बोलताना मराठा आरक्षण देण्यासंदर्भात नेत्यांनी राजकारण केले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे गंभीर परिणाम होतील आणि मराठा समाज या नेत्यांना त्यांची जागा दाखवेल त्यामुळे मराठा समाज हा कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाच्या विरोधात नसून स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही तेव्हा या आंदोलनावर आरोप करणाऱ्यांना वेळप्रसंगी उत्तर दिल्या जाईल असे बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या विदर्भातील पहिली सभा चरण गावात म्हणूनच होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तर दादाराव पाथरीकर आणि यशवंत दांडगे यांनी सुद्धा यावेळी या उपोषणाला पाठिंबा देत आरक्षणासंदर्भातील विचार व्यक्त केले .मराठा आरक्षण क्रांती मैदान चरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची  तयारी अंतिम टप्प्यात
विदर्भात सर्वप्रथम पातुर तालुक्यातील चरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात 29 ऑक्टोंबर 2023 पासून आळीपाळीने उपोषण सुरू असून सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या आंदोलनामध्ये एकवटले आहेत. यामध्ये सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आज या आंदोलनाला 24 दिवस झाले आहेत. आज सुद्धा सदर आंदोलन सुरूच आहे.
चरणगाव येथे सातत्याने आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांनी चरणगाव येथे जाहीर विराट सभा घेण्याचे संमत केले.या धर्तीवर चरणगावातील मराठा आरक्षण क्रांती मैदान येथे 20 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन समितीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली.यादरम्यान निर्भय बनो जनाआंदोलनाचे संयोजक गजानन हरणे ,अखिल भारतीय छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दादाराव पाथरीकर, निर्भय बनोचे जिल्हाध्यक्ष प्रमोद धर्माळे, चरणगाव येथील मराठा योद्धा उपोषणाचे संयोजक राजेश दादाराव देशमुख, समाजसेवक तथा पत्रकार देवानंद गहिले या ठिकाणी उपस्थित होते.  बैठकीत गावकऱ्यांसी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. पुढील सभेचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे.

    Post Views:  329


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख