प्रा.आ.केंद्र गांगलवाडी येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न


युवाक्रांती समाचारचे मुख्य संपादक गुलाब ठाकरे यांनी केले रक्तदान
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  27 May 2022, 6:11 PM
   

ब्रम्हपुरी :  गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन संपन्न  झाला.
तालुक्यातील मुख महामार्गावर असलेल्या गांगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिनांक:- २५/५/२०२२ ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये एकून १९ रक्तदांत्यांनी रक्तदान केले.
स्वरूप बघा विश्र्वरूप तुम्हाला स्वताहुन दिसेल या युक्तीप्रमाणे युवाक्रांती समाचार चे मुख्यसंपादक गुलाब ठाकरे यांनी रक्तदानाची सुरुवात स्वतापासुन करीत रक्त पेढीला रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
 याप्रसंगी अनेक महिला,तरूण, तरूणी नी रक्तदान केलें. भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करीता वैद्यकिय अधिकारी डॉ. के.एस. धनगर, डॉ.ए.ए.भुरले वैद्यकीय अधिकारी,डी.जी.राऊत,आरोग्य सेवक,आर.आर.शेरकी (एल. एच. व्ही),एस.के.धोटे आरोग्य सहायक,तसेच कर्मचारी यांनी  मोलाचे सहकार्य केले.

    Post Views:  207


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व