अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकोला ची जिल्हा व महानगरची सभा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Dec 2025, 12:51 PM
अकोला : अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकोला चे जिल्हाध्यक्ष मनजीत देशमुख यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत सहसचिव विलासराव ठोसर, महानगराध्यक्ष दिनेश पांडे, विदर्भ प्रांत सदस्य,विजय बाहाकर विधी आयाम प्रमुख अँड.सुभाषजी ठाकूर डॉ, संजय धोत्रे यांचे प्रमुख उपस्थितीत १४ डिसेबर २०२५ ला ४ वाजता भाऊसाहेब लहाने सभागृह अकोला येथे संपन्न झाली.
योगायोग असा की विलासराव ठोसर वैयक्तिक कामानिमित्ताने अकोला येथे आले.विनंती वरून ते मासिक सभेला उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून, ग्राहक गीताने सभेला सुरुवात झाली.विलासजी ठोसर यांनी ग्राहकाने व पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहून फसवणूक होऊ नये व ग्राहकांना कसा न्याय मिळवून द्यावा व तक्रारी कुठे कराव्यात बाबत माहिती दिली.
शेंगाव प्रांत अभ्यास वर्गाप्रमाणे, प्रांत अध्यक्ष नारायण राव मेहरे व पश्चिम क्षेत्र संघटन मंञी नितीन काकडे यांचे आव्हानानुसार जिल्हा अभ्यास प्रत्येक जिल्ह्यात व्हावा त्यानुसार जिल्हा अभ्यास वर्गाबाबत तज्ञ वक्त्यांशी व प्रांत अध्यक्ष यांचेशी संपर्क साधून ४ जानेवारी २०२६ चा ठरलेला जिल्हा अभ्यास वर्ग जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे ठरले.
सभेत परिचयासोबत आपले मनोगत व्यक्त करण्याची सुरवातीला विनंती आल्याने अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सभेत तीन तक्रारी आल्या, त्याबाबत मनजीत देशमुख, दिनेश पांडे, विधी आयाम प्रमुख अँड सुभाष ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन करून न्याय मिळवून देऊ असे सांगितले. प्रचार प्रमुख प्रकाश जी गवळी यांनी अपंग व्यक्तींना अमरावती येथे मोफत तपासणी व आवश्यक वैद्यकीय साधने पुरवणाण्याबाबत माहिती दिली. डॉ.एस.व्ही.ठाकरे यांनी सायबर फसवणुकीपासून कसे सतर्क राहावे बाबत माहिती दिली, याबाबत ते पुन्हा अभ्यास वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. रेल्वे बोर्ड मेंबर अँड.सुभाष ठाकूर यांनी आपल्या मनोगतात अकोला येथे अनेक गाड्यांचे थांबे व सुविधा उपलब्ध करून दिल्यात.काही सुचना, तक्रारी असल्यास कळवावे असेही ते म्हणाले.
विदर्भ प्रांत सदस्य विजय बाहाकर यांनी अकोला येथून अमरावती विभागात उद्योग नसल्याने पाचही जिल्ह्याचे मुलं मुली, पूणे येथे नाईलाजाने नोकरी निमित्ताने जावे लागते तसेच व्यावसायिक,पर्यटक इत्यादी कामानिमित्ताने रेल्वेने मनमाड मार्ग, वाशिम मार्ग फेऱ्या ने जावे लागते. म्हणून अकोला ते पुणे व्हाया खामगाव किंवा पातूर मेहकर जालना, औरंगाबाद, अहिल्या नगर मार्ग आत्ताच्या हायवे मार्गानें नवीन रेल्वे मार्ग टाकून लोकल ट्रेन सुरू कराव्या त्यामुळे पैसा, वेळ, मानसिक ञास वाचेल
यावर अँड सुभाष ठाकूर यांनी मागणी योग्य असल्याने त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.साहेबांनी मनावर घेतले तर नवीन रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो. इतिहासात त्यांच्या नावाची नक्कीच नोंद होईल.सभेला विलासजी ठोसर , मनजीत देशमुख, दिनेश पांडे, विजय बाहाकर,विनोद मेहरे, प्रमोद बोरकर ,सुनील बाळापुरे, विनय देशपांडे, एडवोकेट सुभाष जी ठाकूर, शंकरराव जंजाळ, सुनील नारखेडे, डॉक्टर एस .व्ही.ठाकरे, डॉक्टर संजय धोत्रे, शरद यादवडकर, जयंत भोकरे, सौ मृणाल कुलकर्णी, प्रकाश गवळी, प्रकाश विटकरे, मनोहर शिंगणारे, सौ.अर्चना विटकरे, जयप्रकाश पाटील, मुकुंद देशपांडे, देविदास जळमकार, राजू धुरटकर, गजाननराव महल्ले, तुळशीरामजी झटाले, गाठे साहेब, विश्वास चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,सुञसंचलन विजय बाहाकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंत भोकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहमी आयोजन, नियोजन वेळेवर येणाऱ्या समस्या व विषय कुणालाही न सांगता सोडवणारे दिनेश पांडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे तरूणालाही लाजविणारे तरूण तुर्क १६ तारखेला परत येणारे अर्धवट दौरा सोडून शिस्तबद्ध सभा जिल्हा सचिव प्रमोद बोरकर यांनी आणि टीमने सभा यशस्वी केली.अध्यक्षीय भाषण ग्राहकांचे हजारो प्रश्न सोडवणारे हजरजबाबी मनजीत देशमुख यांनी केले, पसायदानाने सभेची सांगता झाली.असे विजय बाहाकर यांनी माहिती दिल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर कळवितात.
Post Views: 28