अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी ग्रंथ मित्र प्रभाकरराव घुगे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Nov 2024, 9:50 AM
वाशिम: वाचन संस्कृतीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील जनतेला वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या बौद्धिक विकास व्हावा या उदात्त भावनेने महाराष्ट्र राज्यात गाव तिथे ग्रंथालय चळवळ ही मोहीम राबविला जाते या चळवळीच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयाचा विकास व्हावा त्यांना शासकीय विविध योजना संबंधी मार्गदर्शन मिळावे विविध प्रकारच्या समस्या निकाली काढाव्यात याकरिता प्रत्येक विभागात विभागीय ग्रंथालय संघ कार्यरत असून अमरावती विभागात सुद्धा अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्याकरिता विभागीय ग्रंथालय संघ अस्तित्वात असून या विभागातील अकोला अमरावती यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यातील प्रत्येकी 21 ग्रंथालय प्रतिनिधी प्रमाणे एकूण ८४ प्रतिनिधींची निवडणूक दिनांक २७ ऑक्टोंबर ला चांदूरबाजार येथे घेण्यात आली असता या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदाकरिता अमरावती जिल्ह्याचे माननीय श्रीराम देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर वाशिम जिल्ह्यातून वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथ मित्र प्रभाकरराव घुगे यांनी सुद्धा अध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये ८४मतदारांपैकी ६८ मतदारांनी मतदान केले त्यामध्ये श्रीराम देशपांडे यांना २८मते मिळाली तर प्रभाकर घुगे यांना ४० मते मिळाली यामध्ये प्रभाकर घुगे यांचा बहुमताने दणदणीत विजय झाला त्यामुळे अमरावती विभागातील ग्रंथालय चळवळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव केला आहे श्री प्रभाकर घुगे यांचे ग्रंथालय क्षेत्रातील गेल्या 30 वर्षापासून फार मोठे योगदान असून ग्रंथालय चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख झाली आहे नागपूर विधानसभेवर ग्रंथालयांच्या विविध मागणी करीता,मोर्च्याचे आयोजन करणे ग्रंथालया संबंधीच्या विविध प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करणे, जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करणे, ग्रंथालयासंबंधीचे प्रशिक्षणाचे आयोजन करणे ग्रंथालयांना योग्य मार्गदर्शन करणे ग्रंथालयांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणे यासारख्या बाबीवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे भविष्यात सुद्धा अमरावती विभागातील ग्रंथालय चळवळीला एक नवी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असून या चळवळीला योग्य न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या विजयामध्ये वाशिम अकोला अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्त्यांचा सहभाग आहे त्याचप्रमाणे या विभागाचे चक्री पद्धतीनुसार विभाग ग्रंथालय संघाचे कार्यालय सुद्धा वाशिम जिल्ह्याला मिळाले ही वाशिम जिल्हा करीता अत्यंत अभिमानाची बाब आहे या विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉक्टर सिताराम तुकाराम नालेगावकर यांची निवड झाली आहे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून समाधान अवचार यांची निवड झाली आहे तर कोषाध्यक्ष म्हणून ज्ञानदेव शंकर भालेराव यांची निवड झाली आहे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी मुळे वाशिम जिल्ह्यात सुद्धा ग्रंथालय चळवळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिजाऊ वाचनालय खडकी तर्फे अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 12