बांगलादेश प्रकरणी अकोला जिल्हा भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला : बंगलादेशमध्ये अनेक दिवसापासून हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत असून येथील मंदिरांची तोडफोड सुरू आहे.बाग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर अंन्याय वाढले आहेत. तेथील हिंदूचे उद्योग-धंदे हिसकावून घेतले जात आहेत. महिला-मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.तर सर्व सामान्य हिंदू नागरिकांसोबत साधू-संतांवरही आता हल्ले करण्यात येत आहेत, इस्कॉन संस्थेचे स्वामी चिन्मयानंदजी यांच्यावरही भ्याड हल्ला करण्यात आला, इस्कॉन संस्थेन बांगलादेशाच्या निर्मितीच्या काळामध्ये पाकीस्तान मधून आलेल्या विस्थापितांना धर्मापेक्षा मानवता धर्माचे पालन करून दररोज दोन लाख नागरिकांना गेल्या पन्नास वर्षापासुन मुक्त जेवणाची व्यवस्था करत आहे, अशा संस्थेवर अशा प्रकारचा हल्ला हा मानवतेला कलंक आहे.येथे सातत्याने हिंदू समाजावर अन्याय सुरू असून,या विरोधात दिनांक 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निरदर्शने करून संयुक्त राष्ट्र संघाने यामध्ये दखल घ्यावी, हिंदूंनां संरक्षण देण्यात यावं भारत सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागण्या करीत अकोला जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती व संयुक्त राष्ट्र कडे निवेदन सादर करून हिंदू वर होणारा अत्याचार थांबवा अशी मागणी करण्यात आली.या प्रकरणी एकही काँग्रेस तसेच काँग्रेस प्रणित आघाडीचे नेते तसेच उद्धव ठाकरे एकही शब्द बोलत का नाहीत, महिलांवर अन्याय होत असताना प्रियंका गांधी ते सुप्रिया सुळे गप्पा का असा प्रश्न भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर निरदर्शने करून संयुक्त राष्ट्र संघाने यामध्ये दखल घ्यावी, हिंदूंनां संरक्षण देण्यात यावं भारत सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा आधी मागण्या करीत दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता अकोला जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती व संयुक्त राष्ट्र कडे निवेदन सादर करून हिंदू वर होणारा अत्याचार थांबवा अशी मागणी करण्यात आली.
Post Views: 4