डॉ . राजेश अग्रवाल यांनी राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती .....


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Mar 2024, 11:28 AM
   

अकोला  : अकोला नगरीतील आरोग्यविषयक उपक्रमात तसेंच  सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुपरिचित व्यक्तिमत्त्व 
डॉ . राजेश अग्रवाल ह्यांची राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या संबंधीचे महाराष्टाचे माननीय राज्यपाल ह्यांचे स्वाक्षरी पत्र  शासन पत्र 14 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आले.
ही नियुक्ती केल्याबद्दल डॉ राजेश अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन,  श्री रणधीरभाऊ सावरकर मा आमदार व भा ज पा महामंत्री महाराष्ट्र  राज्य, खा. डॉ अजित गोपछडे,मा संजय केनेकर, डॉ किशोर मालोकर सर सदस्य महाराष्ट्र भा ज पा ,राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे, व सर्वांचे आभार मानले.
या नियुक्ती बद्दल डॉ. राजेश अग्रवाल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

    Post Views:  105


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व