दिव्यांग सक्षमीकरण हाच आमचा ध्यास


 विश्व प्रभात  02 Dec 2024, 6:42 PM
   

इसवी सन 1992 पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघातर्फे अपंगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे.शारीरिक किंवा मानसिक त्रुटी द्वारे विकलांग झालेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजून घेता याव्यात म्हणून या दिवसाची योजना केली आहे.आपल्या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा हा दिवस.अपंग व्यक्तींच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे,त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांचा साक्षात्कार करून त्यांना जगण्याची उभारी देणे अतिशय महत्त्वाचे आहे.आपण जे करू शकतो ते सर्वकाही ते ही करू शकतात..म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे. हीच संधी विदर्भात प्रथमच दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या राष्ट्रीयकृत संस्थेतर्फे उपलब्ध होत आहे. ही संस्था दिव्यांगांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर आपले कार्य करत आहे. समाज कल्याण विभागातर्फे आदर्श संस्था पुरस्कार सदर संस्थेला प्राप्त झाला आहे .आपल्या सभोवताली असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांना आपण दिव्यांग सोशल फाउंडेशन पर्यंत पोहोचवू शकता, त्यांच्यासाठी सामाजिक व आर्थिक योगदान देऊ शकता.आपल्या वाढदिवसाला व शुभ प्रसंगी   देणगी देऊन संस्थेला मदत करू शकता.या निधीतून दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक गरजा पुरवल्या जातात.ज्याद्वारे तो दिव्यांग व्यक्ती स्वयंपूर्ण होऊ शकतो.दर वर्षी संस्थे तर्फे दिव्यांगांना पांढरी काठी ,ब्रेल बुक्स,विल चेअर  व शिष्यवृत्ती दिली जाते .दिव्यांग प्रशिक्षण कार्य शाळा घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.अंध विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी वाचक व लेखनिक बँकची निर्मिती करून त्यांच्या साठी विविध शक्षणीक उपक्रम निरंतर राबवले जात आहेत .दिव्यांगाणी तयार केलेल्या शोभिवंत वस्तू व  पूजा साहित्याचे प्रदर्शन व विक्री करून दिव्यांगाना स्वयं रोजगाराचे धडे दिले जात आहेत.महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंटरशिप प्रोग्राम आयोजित करून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले जात आहे .आपण सुद्धा संस्थेचे सदस्य होऊन या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवू शकता. अधिक माहिती व नोंदणी करिता संस्थेच्या ९४२३६५००९०या हेल्पलाइन क्रमांका वर संपर्क साधावाआपण  दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या फेसबुक पेज,इंस्टाग्राम पेज व युट्यूब चॅनल च्या माध्यमाद्वारे ही संस्थेविषयी माहिती मिळवू शकता. धन्यवाद!
 लेखक: डॉ.विशाल विजय कोरडे (संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन,अकोला व  सहाय्यक प्राध्यापक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला)
९४२३६५००९०

    Post Views:  7


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व