पुणे येथील विश्व मराठी संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये निसर्गकवी शिवराजे जामोदे कविराज यांनी आकर्षक वेशभूषा व साहित्य प्रचार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Feb 2025, 9:10 AM
तेल्हारा - निसर्गकवी शिवराज जामोदे यांनी पूणे येथील विश्व मराठी साहित्य संमेलनात आकर्षक वेशभूषा आणि कवितांच्या ओळी ड्रेसवर लिहून सर्व जगातून आलेल्या मराठी रसिकांना जिंकले. त्यांच्या अभिनव कल्पनेचे आणि कवितेचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
मराठी आमची भाषा अभिजात
जग जिंकण्याचे बळ हो तिच्यात
पुणे मराठीचा आहे कुंभमेळा
जगी नाही ऐसा साहित्य सोहळा
अशा सुंदर ओळी त्यांनी आपल्या परिधानावर लिहिल्या होत्या. हजारो रसिकांच्या आकर्षणाच्या त्या विषय ठरल्या. तुतारीच्या गजरामध्ये त्यांच्या आकर्षक वेशभूषेचे ग्रंथ दिंडी मध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. शिवराजे जामोदे सर हे वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये आगळी वेगळी वेशभूषा करून व त्यावर कविता लिहून सातत्याने चर्चेत असतात.
मराठी संस्कृती जगती महान
बोलीभाषांचा आम्हा अभिमान
जगात गाजतो मोदींचा नरेंद्र
कोहिनूर हिरा आमचा देवेंद्र
या त्यांच्या काव्याची तर संमेलन भर चर्चा होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल त्यांनी मोठ्या अभिमानाने आपल्या शर्टवर कवितेची पेंटिंग केली होती. शिवराजे जामोदे हे व्यवसायाने शिक्षक असून विविध साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजने त्यांनी यापूर्वी केलेले आहेत. ते तेल्हारा तालुक्यातील आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयांमध्ये मराठीचे विद्यार्थी प्रिय अध्यापक आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 141