विद्यापीठ हायस्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Oct 2023, 6:27 PM
   

 पुणे - आजच्या मोबाईल युगामध्ये वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे  अशी प्रेरणा मुंबई येथील साहित्यिक, कथाकथनकार व निवेदक संजय गवांदे यांनी दिली.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल गणेश खिंड,पुणे येथील प्रशालेमध्ये  वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून  पुस्तक परीक्षण व उतारा पाठांतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  संजय  गवांदे यांनी कविता तालबद्ध रीतीने विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेत वाचनाचे महत्त्व त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे  यांनी तर आभार स्मिता जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या आवेकर यांनी केले.     पुस्तक परीक्षण व उतारा पाठांतर स्पर्धा गौरी गोळे व योगेश्वर चव्हाण यांनी घेतल्या. स्पर्धेत सहभागी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमासाठी पुणे शहर मराठी अध्यापक संघाच्या कल्पना शेरे, विजय शेरे यांचे सहकार्य लाभले. विद्यापीठ हायस्कूल मधील विद्यार्थ्यांबरोबर आयडीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाचा आनंद लुटला. 
कार्यक्रमासाठी उपस्थित मंत्रालयातील माजी सचिव थोरात, आयडियल स्कूलचे अंतरकर, निगडे, ग्रंथपाल सुप्रिया बिरजे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  161


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व