शनिवारी अकोल्यात राज्यस्तरीय गझलरंग मराठी गझल मुशायरा


निलेश कवडे यांच्या दस्ती गझल संग्रहाचे प्रकाशन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Apr 2022, 10:15 PM
   

अकोला  : अकोल्याची जत्रा परिवार द्वारा आयोजित व  सुरेश भट गझलमंच पुणे प्रस्तुत गझलरंग दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन शनिवार ३० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रमिलाताई ओक सभागृह, अकोला येथे करण्यात आले आहे.आजवर सुरेश भट गझलमंच पुणे प्रस्तुत गझलरंग दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याचे महाराष्ट्रभर  १०० पेक्षा जास्त यशस्वी प्रयोग झाले आहेत. गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर (पुणे) करतील. मुशायऱ्यामध्ये सुधीर मुळीक (मुंबई), ज्ञानेश पाटील (जळगाव), 
गणेश शिंदे दुसरबीडकर ( देऊळगाव राजा ), रवि चापके (पुसद), विजयालक्ष्मी वानखेडे  ( बुलढाणा), निलेश कवडे, अमोल शिरसाट, अविनाश येलकर (अकोला) या नामवंत युवा मराठी गझलकरांचा सहभाग राहणार आहे. अकोलेकरांना गझलरंग या दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याच्या माध्यमातून दर्जेदार मराठी गझलांचा आस्वाद घेता येईल. याप्रसंगी स्थानिक गझलकार निलेश कवडे यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई च्या अनुदानास पात्र ठरलेल्या दस्ती या मराठी गझल संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दस्ती गझलसंग्रहाला जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची पाठराखण तर शिवाजी जवरे यांची प्रस्तावना लाभली आहे. याप्रसंगी मा. प्रा. संजय खडसे (निवासी उपजिल्हाधिकारी) , मा. डॉ. दिपक मोरे (एम.डी मेडिसीन), मा. प्रा. डॉ. संतोष हुशे (सामाजिक कार्यकर्ते) , मा. सुगत वाघमारे सुप्रसिद्ध उद्योजक), मा. डॉ. अजय सुरवाडे (सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ) मा. प्रा. नितीन बाठे ( संचालक समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन) , मा. ॲड. पप्पू मोरवाल ( सामाजिक कार्यकर्ते) , मा. पुष्पराज गावंडे  (सदस्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई) , मा. शरद वानखेडे ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी अ. जि. म. बँक अकोला) मा. डॉ. सुचिता पाटेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक), मा. शैलेंद्र गवई ( केंगन वॉटर फॅमिली) आणि मा. विकेश गवई (स्वाद संगम कॅटरर्स )यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.  गझल मुशायऱ्याला मोफत प्रवेश असणार आहे. गझल मुशायऱ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अकोल्याची जत्रा परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

    Post Views:  336


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व