अणुऊर्जा प्रकल्पाला सामाजिक जबाबदारीचा पडला विसर...
(संतोष घरत) - तारापूर : संपूर्ण देशात सुप्रसिद्ध असलेला तेवढाच घातक आणीबाणीच्या प्रसंगी सर्वांचीच पळापळ करणाऱ्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण झालेली दिसून येत आहे. प्रकल्प लगत असलेल्या सोळा किलोमीटर गावांचे संवर्धन करण्याची सामाजिक जबाबदारी असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील या रस्त्यांची झळ बसत आहे. बोईसर येथून अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाण्यासाठी तर या मार्गावरून नोकरीनिमित्ताने तारापूर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या असंख्य कामगारांना देखील जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तारापूर येथील शाळेत तर चिंचणी येथील महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांना देखील या मार्गावर प्रवास करणे बेताचे झाले आहे.
पाचमार्ग नाका परिसरात मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे तेथील नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो.
प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर काम सुरूच असून त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दळणवळण करण्यासाठी अवघड वाहनाची वाहतूक होत असते बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंधन नसल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त दगड माती वाळू या वाहनातून वाहतूक केली जात आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या दर्जाहीन रस्त्यांची चाळण होत असताना सामाजिक जबाबदारी म्हणून अणुऊर्जा प्रकल्पाने त्या परिसरातील रस्ते सिमेंट कॉंक्रीट करून घेतल्यास वर्षानुवर्ष भेडसावणाऱ्या या समस्येवर तोडगा निघण्यास मदत होईल.
अणुऊर्जा प्रकल्पात सुरू असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची दळणवळण होत असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या रस्त्यांची पहिल्या पावसातच ढासाळलेली गुणवत्ता उघड्यावर पडल्यामुळे विध्यार्थी, कामगार वर्ग, जेष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून अणुऊर्जा प्रकल्पाने सिमेंट कॉंक्रीट रस्ता तयार करून समस्यांचे निराकरण करावे
Post Views: 141