आनापान साधनेचा अंगीकार करून रोगमुक्त व्हा..!
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचार मंथन मेळाव्यात गजानन वाघ यांचे प्रतिपादन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-02-28
अकोला - कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसासाठी शरीरस्वास्थ्य ही अत्यंत आवश्यक गरज असून प्रत्येकाने अर्थार्जन व सामाजिक कार्य करीत असतांना शरीर निरोगी कसे राहील याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.त्यासाठी तप सेवा सुमिरन च्या शिबीरामध्ये स्वतः आणि ईतरांनाही सहभागी करून संपूर्ण रोगमुक्तीच्या संकल्पाने निरोगी समाज निर्मितीतून राष्ट्रीय कार्यात सहभागाचे उद्दीष्ट पूर्ण केले पाहिजे.असे प्रतिपादन शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त सहसचिव व तप सेवा सुमिरण चिकित्सा पध्दतीच्या आन पान साधनेचे प्रचारक श्री गजानन वाघ यांनी अकोला येथे केले. या प्रसंगी त्यांनी तप,सेवा,सुमिरण चिकित्सा पध्दतीचे झालेले फायदे तथा शिबीरातील आहार आणि चिकीत्सा पध्दतीची माहिती दिली. पत्रकार महासंघ पदाधिकारी सौ.दिपाली बाहेकर यांच्या संचलनाखाली झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या १८ व्या नियमित मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून बोलत होते.संचलनकर्त्या दिपाली बाहेकर यांना यावेळी जन्मदिन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.सामाजिक हक्क आणि जनजागृतीसाठी सतत दगदगीचे जीवन जगणाऱ्या पत्रकार आण सामाजिक कार्यकर्त्यांना सुदृढ शरीरस्वास्थ्यासाठी या चिकीत्सा पध्दतीची माहिती व्हावी या उध्देशाने लोकस्वातंत्र्यकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री.गजाननजी वाघ हे आना पान साधना आणि शासनाच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त माध्यमातून राष्ट्राचे आधारस्तंभ ४ कोटी विद्यार्थी आणि पालकांना या चिकीत्सेने रोगमुक्त करण्याचा संकल्प राबवित आहेत.त्यासाठी त्यांना अकोला येथेही निमंत्रित करण्यात आले होते.याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा.डॉ.संतोषभाऊ हूशे हे प्रमुख अतिथी तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर),साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य, मार्गदर्शक, पुष्पराजजी गावंडे,ज्येष्ठ पत्रकार,उपाध्यक्ष प्रदिपभाऊ खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख हे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रो येथे नियमित होणाऱ्या या कार्यक्रमात शिरस्त्याप्रमाणे यावेळी सर्वप्रथम पत्रकार महासंघाचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि समाजोध्दारक संत गाडगेबाबांना हारार्पण करून वंदन करण्यात आले.संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून पाहूण्यांचा परिचय व पत्रकार महासंघाची वाटचाल विषद केली.प्रा.डॉ.संतोषभाऊ हूशे ,प्रदिपजी खाडे व राजेन्द्र जी देशमुख यांनी सुध्दा पत्रकार समहासंघाच्या कार्याची माहिती दिली.याप्रसंगी सर्वश्री राधेश्यामजी साव,संदिप वाघडकर,विज वितरणचे उप अभियंता उल्हासजी वाघ,उपाध्यक्ष किशोर मानकर,अंबादास तल्हार,सिध्देश्वर देशमुख,अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,उपाध्यक्ष विवेक मेतकर,मंगेश चऱ्हाटे,रविन्द्र देशमुख,अशोककुमारजी पंड्या,सुरेश तिडके,सागर लोडम,दिलीप नवले,मनोहर मोहोड,सतिश देशमुख,कृष्णा चव्हाण,पंकज देशमुख,प्रा.सुरेश कुलकर्णी,सतिश देशमुख,गजाननराव देशमुख,रवि पाटणे,कु.सुप्रिया देशमुख,सौ.संध्या तल्हार,सौ.नयना देशमुख,सौ.वैशाली देशमुख,अथर्व देशमुख, व ईतर स्नेही व पत्रकार उपस्थित होते.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.आभार प्रदर्शन केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.
Post Views: 119