लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-11-06
   

(प्रमोद अंभोरे)
परभणी- परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका दीड वर्षीय बालकाला दि.०५ नोव्हेंबर रोजी B+ रक्त गटाच्या रक्ताची अत्यंत आवशकता होती. तेंव्हा बालकांच्या नातेवाईक यांच्या विनंतीवरून रुग्णहक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी सय्यद खदिर यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे यांना संपर्क करून रक्त उपलब्ध करून देण्यास विनंती केली. तेंव्हा प्रमोद अंभोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते रुग्णांना वेळोवेळी रक्तदान करून रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सदव्य तत्पर असणारे अजय गायकवाड यांना घेऊन तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक गाठून अजय गायकवाड यांनी रक्तदान करून सदरील बालकास रक्त उपलब्ध करून देऊन जीव वाचवण्याचे काम केले आहे. रक्तदाते अजय गायकवाड यांनी वेळेवर रक्तदान केल्यामुळे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्णहक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचा पुष्पगुछ देऊन व पुष्पहार घालून सत्कार करून आभार माणण्यात आले. रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल रुग्णाचे नातेवाईक यांनी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्णहक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठान चे आभार मानले आहे. 
सदरील रुग्ण बाळाला रक्त उपलब्ध करून देण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष संजयजी देशमुख, महाराष्ट्र प्रसिद्धी संघटन प्रमुख भगीरथ बद्दर, डिझिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष वाजेद खान, मराठवाडा पदाधिकारी देवानंद वाकळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ  तथा रुग्णहक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान प्रमोद अशोकराव अंभोरे, रुग्णहक्क संरक्षण समिती तथा मुस्लिम विकास परिषद चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, परभणी तालूका अध्यक्ष युनूस बोगानी कच्ची, तालुका संघटक सय्यद खदिर, फारूक भाई, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कच्छवे ब्लड बँक  कर्मचारी डॉ. गजानन केंद्रे, माधव गोचडे, मुरलीधर पवार, हमीद सिद्दीकी, दीपक कंडेरे व रुग्ण बालकाचे नातेवाईक आदींची उपस्थिती होती.

    Post Views:  20


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख