दयावान सरकार व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने गरजू रुग्णास मदत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Sep 2024, 8:46 AM
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) संपूर्ण महाराष्ट्रात गोर गरीब गरजू लोकांना, रुग्णांना, फसवणूक ग्रस्त, अन्यायग्रस्त लोकांना निःस्वार्थ भावनेने मदत करणारी मा. संदीपभाई निकुंभ यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी च्या वतीने परभणी शहरातील परभणी आय. सी. यु. व श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या गरजू महिला रुग्ण व नवजात शिशु यांची मदत केली आहे.
अधिक माहिती अशी कि, शहरातील परभणी आय. सी. यु. व श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या दूधगाव ता. जिंतूर येथील गरजू महिला रुग्ण व नवजात शिशु हे गेल्या 2 दिवसापासून डिलिव्हरी साठी दाखल झाले होते. परंतु रुग्णाचे नातेवाईक यांना रुग्णाची सद्यस्थिती व नवजात शिशुच्या स्वास्थ्याबद्दल काही समजत नसल्यामुळे माहिती मिळत नव्हती. रुग्णाचे नातेवाईक हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना माहिती घेण्यास अवघड होत होते. तेंव्हा रुग्णाचे नातेवाईक यांनी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या परभणी जिल्हाध्यक्षा महिला आघाडी उषाताई पंचांगे यांना संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. तेंव्हा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी परभणी जिल्हाध्यक्षा महिला आघाडी उषाताई पंचांगे, दयावान सरकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव प्रमोदभाई अंभोरे, परभणी शहर उपाध्यक्ष कैलास भाऊ पतंगे, भिमाकोरेगाव मित्र मंडळ अध्यक्ष संदीप वायवळ, किशोर डोंगरे आदीनी सदरील रुग्णालय गाठून परभणी आय. सी. यु. चे डॉ. सूर्यकांत देशमुख व श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथील डॉ. शर्मा यांची भेट घेऊन सदरील रुग्णांनाबद्दल माहिती घेतली यावेळी डॉक्टर यांच्या सांगण्यावरून दोन्ही रुग्णाची तबियत ठीक असल्याचे सांगितले. व संबंधित माहिती मिळवली यावेळी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर डॉ. सूर्यकांत देशमुख व डॉ. शर्मा यांनी व्यवस्थित सहकार्य करुन व्यवस्थित अशी माहिती दिली. रुग्णाचे नातेवाईक मिळालेल्या माहितीनुसार समाधानी झाले होते. तसेच रुग्ण चे गरीब कुटूंबियांतील असल्या कारणाने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे डॉक्टर यांच्या लक्षात आणून दिल्या नंतर डॉ.सूर्यकांत देशमुख व डॉ. शर्मा यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे दयावान सरकार व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ यांच्या पदाधिकारी यांना आश्वासन दिलें आहे. हे आश्वासन दिल्या बद्दल दयावान सरकार व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने दोन्हीही रुग्णालयातील डॉक्टर यांचे आभार मानले. यावेळी परभणी जिल्हाध्यक्षा महिला आघाडी उषाताई पंचांगे, दयावान सरकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव प्रमोदभाई अंभोरे, परभणी शहर उपाध्यक्ष कैलास भाऊ पतंगे, भिमाकोरेगाव मित्र मंडळ अध्यक्ष संदीप वायवळ, किशोर डोंगरे व रुग्णाचे नातेवाईक सागर हटकर, निर्मला कागदे, गंगुबाई ठोके, राजू ठोके, वैभव जोंधळे आदींची उपस्थिती होती.
Post Views: 45