देगलूर महाविद्यालयात स्पर्धापरीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Sep 2023, 5:59 PM
   

देगलूर : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून येथील देगलूर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आज बक्षीस वितरण करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयात स्थापन केलेल्या स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केद्रां तर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव निमित्त इयत्ता अकरावी बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे आयोजन (दि.१२सप्टेबंर )रोजी करण्यात आले होते.यापूर्वी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी कुलदीप जगंम यांनी केले होते यात न. पा. मुख्याधिकारी  सुदंर बोंदर प्रयोजना नेम्मानीवार ,पोलीस उपनिरीक्षक कल्पना गिरी संग्राम पाटील, प्रा सौ अनिता देबडवार, शिवानंद सुर्यवंशी,रत्नाकर चिद्रावार, कपिल तोटावार,संतोष वानोळे, डाॅ चद्रशेखर बाकेवाड आज पावेतो यांची व्याख्याने झाली होती.स्पर्धा  परीक्षेत प्रथम कु.मोनिका विश्वनाथ चक्कावार तर सर्व द्वितीय क्रमांक कु.कल्पना संजय मडपलवार ,कु.वैष्णवी गोपाळ इंदूरकर, कु.स्फुर्ती इरवंत मोखेडे (कला शाखा) सर्व तृतीय कु. पुजा माधव चिंचोले  या गुणवंत विद्यार्थ्यांना  स्व .शकंरराव लक्ष्मणराव तोटावार व कै. ललिताबाई नागोराव कुलकर्णी स्मरणार्थ पुरस्कार व प्रमाणपत्र, प्रा कपिल तोटावार, प्रा. महेश कुलकर्णी यांच्या वतिने तसेच महाविद्यालयाच्या वतिने ठेवलेले बक्षीसांचे  वितरण आज (दि१७ सप्टेबंर )अ व्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश पाटील बेबंरेकर सचिव मा.शशीकांत चिद्रावार कार्यकारणी सदस्य देवेंद्र मोतेवार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ उपप्राचार्य डाॅ.अनिल चिद्रावार, प्रा.उत्तमकुमार काबंळे पर्यवेक्षक एस एन पाटील स्पर्धापरीक्षा संयोजक शिवचरण गुरूडे बाळासाहेब नागरगोजे, संतोष वानोळे रत्नाकर चिद्रावार सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

    Post Views:  254


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख