विदर्भ लेखिका साहित्य संमेलनात सौ.नयना देशमुख यांचा सहभाग


विनोदी कवितांनी घडविला हास्यकल्लोळ..!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Oct 2024, 12:14 PM
   

नागपूर - महिलांच्या साहित्य विश्वातले दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन व विदर्भ लेखिका सन्मान समारोह नागपूर येथील सेवादल शिक्षण संस्थेच्या सेवादल महिला महाविद्यालयात नुकताच पार पडला.या संमेलनात बुलढाणा येथील प्रथितयश कवियत्री सौ.नयना अजयराव देशमुख यांच्या विनोदा कविता हास्यकल्लोळाने तुफान दादा मिळवून गेल्या. त्यातील त्यांच्या "बाईपण भारी" या कवितेला साहित्यिक आणि रसिकांनी  टाळ्या वाजवून दाद दिली. सौ.नयना देशमुख ह्या विदर्भातील एक संवेदनक्षम भावनाशील कवियत्री असून  राज्यातील अनेक कवी संमेलनात  त्यांचा यशस्वी सहभाग असतो. आयुष्याचा प्रवासातील संघर्षातून प्राप्त अनुभवांच्या स्पर्शांनी मानवी जीवनाला उभारी देणाऱ्या त्यांच्या कविता असतात.तशाच त्या वास्तव भावना आणि कर्तव्याचे संदेश देणाऱ्या असतात.त्या मानवी जीवनातील वास्तव सत्याच्या साध्या,सरळ,सोप्या शब्दशृखंलेतून भावनांना हात घालून अंतर्मुखतेकडे वळविणाऱ्या असतात.
     माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठाण नागपूर व सेवादल महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.सुप्रसिध्द साहित्यिका विजया ब्राह्मणकर या संमेलनाच्या अध्यक्षा तर सेवादल शिक्षण संस्थेच्या वृंदा संजय शेंडे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा होत्या.मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.विजया मारोतकर तथा सेवादल महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ.निरूपमा ढोबळे यांच्या संयोजनाखाली हे लेखिका संमेलन महिला साहित्यिकांच्या आणि रसिकांच्या लक्षणिय सहभागाने यशस्वीपणे पार पडले.

    Post Views:  219


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व