उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंजर येथे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त


 संजय देशमुख  07 Dec 2021, 8:13 PM
   

 अकोला,दि.(जिमाका)- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाअकोला यांचे आदेशानुसार उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिजर र. नं. ४०१या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन संस्थेवर त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.

त्यामध्येरोहीणी रा. विटणकर- सहाय्यक निबंधकसागर एन इंगळेतालुका लेखापरीक्षक  व चेतन बी गोरेगावकरउपमुख्याधिकारीअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकयांचा समावेश आहे. प्रशासक मंडळाने संस्थेचा पदभार स्विकारलेला आहे. प्रशासक मंडळाने दि.१५/०९/२०२१ रोजी पदभार स्विकारलेला असल्याने संस्थेचा देणे- घेणे विषयक सर्व व्यवहार प्रशासक मंडळच करीत आहे. या संस्थेच्या सर्व सभासदांनी सर्व आर्थिक व्यवहारांसाठी प्रशासक मंडळ,व्दारा, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बार्शीटाकळी यांचे कार्यालयआखाडे सदनखडकपुरा चौक, बार्शीटाकळी या कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रशासक मंडळाशिवाय इतर कोणाशीही संस्थेशी संबंशित आर्थिक कर्जभरणा करणे . व्यवहार करू नये, असे आवाहन संस्थेच्या प्रशासक मंडळामार्फत करण्यात आले आहे. या उपरही प्रशासक मंडळाच्या कालावधीत इतरत्र संस्थेचे संबंधी आर्थिक व्यवहार केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही, असे  प्रशासक मंडळ, उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पिंजर यांनी कळविले आहे.

    Post Views:  241


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व