लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघघाकडून गरजू रुग्णास रक्त उपलब्ध करून देऊन मदत
परभणी (प्रतिनिधी) दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला AB+ रक्त गटाच्या रक्त पिशवीची अत्यंत आवश्यकता होती तेंव्हा प्राणी मित्र गोसेवक मा. नितीन महाराज गोगलगावकर यांनी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा सचिव प्रमोद अकशोकराव अंभोरे यांच्याशी संपर्क साधून रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मदत मागीतली होती. तेंव्हा त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक परभणी येथून विनामूल्य रक्त पिशवी उपलब्ध करून देऊन मदत केली आहे. यावेळी प्रमोद अशोकराव अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते शेख कलीम, संदीप वायवळ, शंकर बनसोडे, दत्ता सोमवंशी, बबन अण्णा मुळे, नितीन जाधव गोगलगावकर, सिद्धार्थ शिंगारे आदींची उपस्थिती होती.
Post Views: 42