विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाद्वारा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Oct 2022, 2:41 PM
   

अकोला, दि. 22 ऑक्टोबर : विदर्भ साहित्य संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विदर्भ साहित्य संघ, अकोला’ शाखेद्वारा राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. हे साहित्य संमेलन स्व. बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल, वाशिम रोड, अकोला ह्या भव्य दिव्य परिसरात 5 व 6 नोव्हेंबर 2022 ला संपन्न होणार आहे. 
ह्या संमेलनामध्ये दोन दिवस तरुणाईचा वैचारिक जल्लोश राहणार असून ह्या संमेलनाचे कार्यालयाचे उद्घाटन 21 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी तोष्णीवाल ले-आऊट स्थित प्रभात किड्स स्कूलमध्ये साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थिती पार पडले. 
ह्या कार्यालय उद्घाटन समारंभाप्रसंगी वि.सा. संघ अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल, स्वागताध्यक्ष श्री संग्रामभैय्या गावंडे, संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, संमेलन सरचिटणीस अशोक ढेरे हे साहित्यिपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम वि.सा. संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर ह्यांच्या फोटोचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. गजानन मालोकार ह्यांनी केले तर संमेलनातील आयोजित कार्यक्रमांचा दोन दिवसीय नियोजित कार्यक्रमाचा आलेख संमेलन मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे ह्यांनी विस्तृतपणे मांडले, तर स्वागताध्यक्ष श्री. संग्रामभैय्या गावंडे ह्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व साहित्यिक व सहयोगी संस्थांच्या पदाधिकार्‍यांना विनम्र आवाहन केले. ह्यानंतर सहभागी संस्थांतर्फे प्रा. मधु जाधव ह्यांनी संमेलन यशस्वीतेकरीता आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संमेलन चिटणीस तथा वि.सा.संंघ सहसचिव प्रा. डॉ. सुहास उगले ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे पदाधिकारी प्रा. डॉ. गजानन मालोकार, शाखा सचिव तथा संमेलन सह कार्यवाह डॉ. विनय दांदळे, प्रा. निशा बाहेकर, डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. दिलीप इंगोले, प्रशांत असनारे यांचेसह सहयोगी साहित्य संस्थाचे पदाधिकारी श्याम ठक, पुष्पराज गावंडे, प्रा. महादेव लुले, निलेश कवडे, राजेश ताले, अनिल माहोरे, राजु उखळकर, शरद वानखडे, अ‍ॅड. विनोद साकरकार, रोहित हिवरकर, शरद कोकाटे, डॉ. प्रदीप अवचार, अमोल गोंडचवर, नरेंद्र चिमणकर, चंद्रकांत झटाले, मिलींद सभापतीकर, चंद्रकांत पोरे, आनंद जोशी, अ‍ॅड. सुधाकर खुमकर, प्रदीप अवचार, काजल राऊत, गजानन चौधरी, प्रदीपसिंह राजपूत यांचेसह बहुसंख्य साहित्यिक व सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    Post Views:  374


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व