पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्यासाठी सातव चौकात कृत्रीम गणेश विसर्जन कुंड :- निलेश देव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2024, 6:33 PM
अकोला : दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जन पर्यावरण पुरक व्हावे प्रदुषण नियंत्रणासाठी आपला हातभार लागावा या उद्देशाने तसेच व धार्मिक भावना, भक्तीमय वातावरणात जठारपेठ, रामदास पेठ ,तापडीया नगर, राऊत वाडी,न्यु तापडीया नगर,खरप, तसेच प्रभाग 6 व प्रभाग क्र.3 च्या भावीकभक्तांच्या सोयीसाठी सातव चौक मध्ये मागील १४ वर्षीपासुन कृत्रीम गणेश विसर्जन कुंड निर्माण करण्यात येते , यावर्षी सुध्दा दरवर्षी प्रमाणे सर्व सुविधायुक्त गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कृडं निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे, असून नागरिकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्य साठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा अँड धनश्री देव यांनी १४ वर्षी पुर्वी घेतला होता अकोला शहरातील कृत्रिम विसर्जन कुड निमीत्त तसेच निर्माल्य रथ संकल्पना कार्यान्वित केली व तेव्हा पासुन सातव चौक येथे गणेश मूर्ती विसर्जन कुत्रिम घाट व मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन, मूर्ति पूजा व्यवस्था स्थानिक सातव चौक येथे कार्यान्वित करण्यात आली. कोरोना काळात फीरते गणेश विसर्जन कुंड कार्यान्वित करणारी निलेश देव मित्र मंडळ हि विदर्भ तील पहिली संस्था तसेच निर्माल्य कलश रथ कार्यान्वित करणारी विदर्भात अकोला एकमेव आहे.
सातव चौक येथे येथे १७ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुविधायुक्त निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. अशी विनंती अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, अँड धनश्री देव स्मृती रुग्ण कल्याण उपकरण बँक, निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 143