विजयकुमार शेटे यांना लाईफ टाईम अचीवमेंट ॲवॉर्ड 2022 ने सन्मानित


 संजय देशमुख  2022-09-08
   

श्री सत्य़इंदिरा फाउंडेशन द्वारा संचालित संस्थेद्वारे ,धर्म और जाती  से उपर उठकर इंसान और इन्सानियत के लिए कार्यरत संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. केंद्रीय कार्यालय धनश्री टॉवर सेंट्रल स्पाईन विद्यानगर  जयपुर राजस्थान येथे स्थापित आहे.

     5 सप्टेंबर भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षण व समाजसेवा या कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे.या संस्थेच्या विविध कार्यकारी योजना अन्नदान योजना, पाठशाळा, स्ट्रीट क्लासेस, बचपन बचाओ अभियान, महिला शिक्षा रोजगार एवं उत्थान,झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांचा विकास इत्यादी विविध कार्यकारी योजना या संस्थेने राबविलेल्या आहे.
       श्री विजयकुमार शेटे यांना ऑनलाईन प्रशस्तीपत्र  देऊन गौरवण्यात आले आहे. देशातून विविध राज्यातील 38 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ८ व्यक्तींना देण्यात आलेला आहे. आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिलेला आहे. यापूर्वी  शेटे यांना विशेष पुरस्कार प्राप्त झालेले आहे. या संस्थेचे भरीव  कार्याचा उल्लेख म्हणून त्या संस्थेच्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्षा एस.स्मृति सारस्वत यांनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील 
व्यक्तिंना पुरस्कार दिलेले आहे.
       शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शंकर ठोकळ, पालक व ग्रामस्थ,मुख्याध्यापक बापूराव दराडे,केंद्राचे केंद्रप्रमुख भरतराव लोखंडे, गटशिक्षणाधिकारी जीवनजी कोकणे यांनी शेटे यांचे अभिनंदन केले आहे.

    Post Views:  321


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व