जिवरक्षक दिपक सदाफळे आणि सहकारी उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन म्हणून सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jan 2024, 1:11 PM
   

2023 या काळात जिल्हयात पुरपरीस्थितीत व गणेश,दुर्गा विसर्जन स्थळी आणी पालखी सोहळा ठीकाणी सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी भरीव कामगिरी केली तसेच खरप ढोरे येथील पुरात अडकलेल्या     शेतक-यास सुखरुप बाहेर काढले याच प्रमाणे अकोला शहरातील शिवसेना वसाहतीतील वृद्धाला पुरात वाहून जात असतांना वाचविले, यासोबतच सतर्क अभियान राबवुन आपत्ती व्यवस्थापन जणजागृती केली याच कार्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आणी ....
प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री स्टेडियम अकोला येथे जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमात महाराष्ट्रात एक नंबरवर आपत्ती व्यवस्थापनात सदैव अग्रेसर असणा-या अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थाप फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक चे संस्थापक अध्यक्ष दिपक सदाफळे (जिवरक्षक) यांना अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननिय अजित कुंभार सर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक माननिय बच्चन सींह सर यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी माननिय वैष्णवी बी मॅडम आणी मान्य वरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी आमचे मार्ग दर्शक निवासी उप-जिल्हाधिकारी माननिय विजय पाटील सर,उप-वि. अ.डाॅ.शरद जावळे सर, तहसीलदार पवन पाटील सर,नेहमी सहकार्यशील असणारे जिल्हा आ.व्य.अ. संदीप साबळे साहेब हे उपस्थित होते. या भव्यदीव्य अशा सन्मान सोहळ्यात जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी सन्मानित होत असतांना उपस्थितांनी टाळयांच्या खळबळाटाने स्वागत केले. हा क्षण आमच्या साठी एक अविस्मरणीय होता यामुळे जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभारी आहोत अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

    Post Views:  144


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व