बोईसर ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर दिलीप धोंडी तर उपसरपंच निलम संखे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Oct 2022, 9:52 PM
बोईसर : (संतोष घरत )- महाराष्ट्रातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचपदी दिलीप धोडी तर उपसरपंच पदी श्री.निलम संखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बोईसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधक नसल्यामुळे सदस्यपदी निलम संखे यांची निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र दवणे यांनी बिनविरोध निवड केली होती तर उपसरपंच पदासाठी सर्व सदस्यानी पाठिंबा देत इतिहासात प्रथमच बोईसर ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी निलम संखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सर्व पक्षीय पाठिंबा मिळाल्यामुळेच मी उपसरपंचपदी विराजमान आहे. सर्व निवडून आलेले सदस्य हे उपसरपंचच आहेत असे निलम संखे ह्यांनी बोलताना सांगितले.बोईसरचा विकास हा सर्व राजकीय पक्षांना व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन करण्यात येईल तसेच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे काम करू असे देखील उपसरपंच निलम संखे यांनी सांगितले.
सर्वांना विश्वासात घेऊन बोईसरचा विकास साधू तर एक अनुभवी उपसरपंच सोबत असल्यामुळे विकास कामे करताना अडथळा निर्माण होणार नाही. असे थेट सरपंच दिलीप धोडी यांनी बोलताना सांगितले.
सदर कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी दवणे यांच्या उपस्थितीत थेट सरपंच दिलीप धोडी, भारतीय जनता पक्षाचे पालघर उपाध्यक्ष अशोक वडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, सुरेश जाधव, प्रशांत संखे, अल्पेश मोरे, मनोज मोर , माजी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच बोईसर ग्रामस्थ, पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत सरपंच पदग्रहण तसेच उपसरपंच पदाची निवड करण्यात आली.
Post Views: 328