सुरेश पाचकवडे यांच्या देहाक्षरं कथासंग्रहास सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर....
अकोला- मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा असलेला दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान चेंबूर - मुंबईचा राज्य साहित्य पुरस्कार अकोला येथील जेष्ठ कथालेखक, कवी सुरेश पाचकवडे यांच्या देहाक्षरं या कथासंग्रहास जाहीर झाला आहे . यापूर्वीही या कथासंग्रहास वैखरी साहित्य पुरस्कार खामगाव , स्व. सूर्यकांतादेवी पोटे स्मृती पुरस्कार अमरावती मिळाला असून हा त्यांच्या देहाक्षरं या पुस्तकास जाहीर झालेला तिसरा पुरस्कार आहे . सुरेश पाचकवडे यांच्या कथा - कवितांची एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या गोंदणवेणा या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पु.बा. भावे मराठी वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे . त्यांच्या इतर साहित्यकृतीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत ..आजवर चार राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे . विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे ते उपाध्यक्ष आहेत . कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.कॉम. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात त्यांची कविताही समाविष्ट आहे तसेच अकोला जिल्हा मराठी भाषा समितीचे ते सदस्य आहेत . त्यांच्या या जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य वर्तुळामध्ये अभिनंदन होत आहे .
Post Views: 23