अकोला - जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड लाईन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बालगृहातील 105 बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यात महिला व बालविकास विभागांतर्गत मान्यता प्राप्त बालगृहांमधील प्रवेशीतांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता बालगृहातील 105 बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्याण बालकांनी तयार केलेले 25 आकाश दिवे बालगृहामध्ये सजविण्यात आले. अकोला जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुर्योदय बालगृह व गायत्री बालीकाश्रम व शासकीय बालगृह या ठीकाणी देण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडूलकर, जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, चाईल्ड लाइनच्या समन्वयक हर्षाली गजभीये आदिंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Post Views: 134
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay