श्री जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी सन्मानित
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
01 Apr 2022, 1:51 PM
नांदुरा : कोठारी अध्यापक विद्यालय, नांदुरा यांच्या विद्यमाने आज दि . ३१ मार्च २०२२ रोजी क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले .त्या मध्ये नांदुरा नगरीतील उपक्रमशील शाळा संत श्री जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजला भेट देऊन, प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थांना शाळेतील भौतिक सुविधा व शैक्षणिक प्रगतीसाठी उपक्रमशील प्राचार्य श्री विश्वास मापारी सर यांनी शिक्षणाची दशा व दिशा या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन करून त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

सोबतच प्रथम व द्वितीय वर्ष शिक्षण पदविका अभ्यासक्रमातील प्रत्येकी एका प्रशिक्षणार्थानीला प्राचार्य पदाचा लक्षणीय क्षणीक पदभाराचा बहूमान देऊन नवचैतन्य निर्माण केले. प्रत्यक्ष भेटीचे आयोजन कोठारी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मा .लोणाग्रे मॅडम व प्रा. वाकोडे सर , प्रा धोरण सर, प्रा वेरुळकर सर, प्रा. लोखंडे मँडम, प्रा शैलेश ठाकूर सर, प्रा बोदडे सर यांनी केले व संत जंगली महाराज ईंग्लिश स्कूल व ज्युनिअर काँलेजचे शिक्षकवृंद प्रा गिरी सर, प्रा.मलिक मँडम, प्रा. पांडव मँडम, प्रा. बाठे मँडम प्रा. ठोले सर, प्रा. उधानी मँडम उपस्थित होते व क्षेत्रभेटीचा उद्देश पूर्णत्वास नेला.
Post Views: 391