प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा येथील वैद्यकीय अधिकारी सेवेत तत्पर
अकोला (अशोक भाकरे) आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र,आपातापा, येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत भेंडेकर रुजू झाल्यापासून दिवस असो वा रात्र सर्व प्रकारच्या रुग्णांवर त्यांच्याद्वारे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी यांच्या द्वारे प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तसेच एखादेवेळी पुढील अत्यावश्यक उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करण्यात येते.आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र आपातापा येथे आज रविवार 18 ऑगस्ट 2024 रोजी शासकीय सुट्टीचा दिवस असून सुद्धा सकाळी 9.56 वाजता आपातापा उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या आपोती बु. येथील रहिवासी भानुदास तराळे वय 76 वर्ष यांना रानटी डुक्कराने चावा घेतल्या मुळे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा येथे आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर योग्य तो प्राथमिक उपचार केला तसेच आवश्यक ते मेडिसिन सुद्धा देण्यात आले. असे वैद्यकीय अधिकारी मानवी रूपात देवासारखे धावून आले असून त्यांची सेवा ही मनापासून असल्याचे दिसून आले तसेच ती रुग्णांची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची काठ कसर तसेच कुठल्याही प्रकारचा कसूर करत नसल्याचे सुद्धा त्यांच्या सेवेतून दिसून येते. राहणार घुसरवाडी तालुका जिल्हा अकोला येथील विजयकुमार घावट (झंका पाटील) हे गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसले असता त्यांची सुद्धा प्राथमिक उपचार व सेवा देऊन श्री श्रीकांत भेंडेकर वैद्यकीय अधिकारी यांनी आपली कर्तव्य बजावून तत्परता दाखवली आहे खरंच असे वैद्यकीय अधिकारी जर आपल्या ग्रामीण भागात असतील तर सर्वसामान्य जनतेला ते एक मानव रुपी आधार समजावे लागेल.वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत आरोग्य सेविका राजकन्या थोरात ह्या सुद्धा आरोग्य सेवा देण्याकरिता सोबत गेल्या होत्या त्यांच्या या कार्याला मनापासून आभार.
Post Views: 96