बोईसरमध्ये चाकूच्या धाकावर ४६९००/- लुटले; आरोपी गजाआड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Dec 2022, 7:30 PM
   

बोईसर- (संतोष घरत ) : महिला आणि दोन लहान मुले रूम मध्ये झोपले असताना शेजारीच राहत असलेला संखे आणि त्याचा एक साथीदार रात्री 2:00 वाजेच्या सुमारास चाकू घेऊन रूम मध्ये शिरले. आणि महिलेला चाकू दाखवत 46900/- रुपयांच्या मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना 4 डिसेंबर ह्या तारखेला रात्री 2:00 वाजता घडली. सदर घटनेची तक्रार दाखल होताच
अवघ्या 4 तासातच बोईसर पोलिसांनी उत्तम कामगिरी करत निखिल संखे या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.किसन यादव हा मूळ बिहार राज्याच्या रहिवासी असून तो पत्नी रेखा देवी आणि दोन लहान मुलांसोबत कोलवडे येथे वसंत संखे यांच्या रूम मध्ये भाड्याने राहतो. किसन यादव हा बोईसर औद्योगिक क्षेत्रातील इंडिगो या कंपनीत कामाला आहे. किसन यादव ह्याची रात्रपाळी असल्याने 3 डिसेंबर ला  रात्री 7:30 वाजता कामावर गेल्याने घरी रेखा देवी आणि दोन लहान मुले  होते. 4 डिसेंबरच्या रात्रीचे दोन वाजता निखिल संखे आणि त्याचा एक साथीदार हे किसन यादव यांच्या रूम मध्ये चाकू घेऊन शिरले. त्यांच्या आवाज ऐकून रेखा देवी जागी झाली आणि बघितले असता शेजारी राहत असलेला निखिल संखे आणि एक अनोळखी व्यक्ती घरात चाकू घेऊन शिरले आहेत. रेखा देवी ला चाकू दाखवत घरातील ३४,४०० रुपयांची रोख रक्कम, दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २५०० रुपयांचा मोबाईल घेऊन पसार झाले. महिलेने याबाबत बोईसर पोलिसात तक्रार दाखल केली.  याबत बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ, उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा. बोईसर ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय. शरद सुरवळकर पि.एस.आय. विठ्ठल मनिकेरी, पोलीस हवलदार, दुसाने, पोलीस नाईक सोनवणे, गावित, पोलीस अंमलदार वाघचौरे, साळुंखे, देवेंद्र पाटील यांच्या टीमने उत्तम कामगिरी करत अवघ्या 4 तासातच आरोपी निखिल संखे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.गुन्ह्याच्या पुढील तपास पि.एस.आय. शरद सुरवळकर करीत आहेत.

    Post Views:  208


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व