युवा विचारपीठ कडून एक राखी समाज रक्षणार्थ


 संजय देशमुख  03 Sep 2023, 4:48 PM
   

अकोला: युवा विचारपीठ अकोला च्या वतीने एक राखी समाज रक्षणार्थ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजातील प्रत्येक घटकासाठी कधी डॉक्टरस,नर्स,पोलीस,
ॲम्बुलन्स सेवा,चालक, सुरक्षा रक्षक,वॉर्ड बॉय, इलेक्ट्रिशियन या सर्व माध्यमातून सेवा देत रात्र-दिवस आपले कर्तव्य करण्यास नेहमी तत्पर असतात .या सर्वाप्रती आदर,स्नेह,कृतज्ञता व्यक्त व्हावी या करिता युवा विचारपीठ च्या सर्व सदस्यांनी अकोल्यातील विद्युत पुरवठा ऑफिस,गव्हर्मेंट रुग्णालय,पोलीस स्टेशन , अश्या ठिकाणी जाऊन रक्षाबंधनाच्या माध्यमातून सर्वांना राखी बांधली आणी सन्मान शुभेच्छा पत्र देऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला.या प्रसंगी युवा विचारपीठ चे मुख्य संयोजक श्री निलेश ढाकरे ,मुख्य संयोजिका सौ स्मिता अग्रवाल,समन्व्यक श्री राजेश अग्रवाल,श्री दीपक सोलकर,श्री सुदेश काळपांडे, श्री सुनील जयपिल्ले,श्री कौशल पाठक. समन्वयिका सौ ज्योती सोलकर,सौ रश्मी पाटील,ऍड सपना गव्हाळे,सौ दुर्गा नाचणे,सौ,अश्विनी ढोरे कु.कल्याणी कोथळकर,कु.सुरभी दोडके हे उपस्थित होते.

    Post Views:  178


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व