50 फुट खोल विहिरीतून ईसमाचा मृतदेह दहा मिनटातच शोधून बाहेर काढला
*पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची अशीही कल्पकता दहाच मिनिटात मृतदेह शोधून बाहेर काढून दीला*
वाशिम जिल्ह्य़ातील कारंजा लाड तालुक्यातील कारंजा शहराला लागूनच असलेल्या कीनी रोकडे येथील रहीवाशी नारायण गुलाबराव रोकडे वय अं. (65) वर्ष हे बराच उशीर झाला घरी परतले नव्हते तेव्हापासून घरच्यांनी शोधा घेतला असता गावातीलच विहीरी जवळ त्यांचे वाॅकर आणी विडी बंबल दिसुन आले तेव्हा हे विहरीतच असल्याची दाट शक्यता झाली आणी विहरीत स्थानिक पातळीवर गावक-यांनी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही तेव्हा कारंजा शहर पोलीस ठाण्याचे पिएसआय मुरलीधर उगले साहेब यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच दिपक सदाफळे हे आपले सहकारी मयूर सळेदार,मयुर कळसकार,निलेश खंडारे, विकास सदांशिव यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन कीनी रोकडे येथे पोहचाताच दहाच मिनिटात 50 फुट खोल पाण्यातुन मृतदेह शोधून बाहेर काढून दिला यावेळी घटनास्थळावर कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश शुक्ला सर,पिएसआय मुरलीधर उगले सर,पो.काॅ.शिवाजी ठवकर,पो.काॅ.शाम ठाकुर तसेच सरपंच मीनाताई रोकडे,उपसरपंच अमिरखा, तलाठी अर्चना चिकटे, कोतवाल तेजस रोकडे आणी गावातील नागरिक हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
Post Views: 93