लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या किशोर मुटे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
08 Jul 2022, 7:06 PM
वर्धा - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख व पोलिस मित्र,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेनेचे विदर्भ अध्यक्ष श्री किशोर मुटे यांना पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार समारोहात महाराष्ट्र गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना,पोलिस मित्र,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना,व ऑल इंडीया अॕंन्टीकरप्शन पार्लामेन्ट कमिटी,भारतीय महाक्रांती सेना,क्राईम प्रिव्हेन्शन अॕंन्टीकरप्शन कमिटी,व कल्याणी महिला बहूउध्देशिय सेवाभावी संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा पुणे येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी किशोर मुटे यांचा शाल,स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छासह महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.ते वर्धा जिल्ह्यात ग्राहकांच्या हितासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते असून अ.भा.ग्राहक परिषदेचे ते वर्धा जिल्हा संघटक आहेत. त्यांना प्राप्त सन्मान हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचाही बहुमान असल्याच्या भावना व्यक्त करून संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त त्यांचे अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा व पुण्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्त सौ.रूक्मिणी गलांडे ह्या प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे आमदार सुनिलआप्पा टिंगरे,सहा.पोलिस आयुक्त दिपक हुंबरे,अस्थिरोग तज्ञ डॉ.संजय धुर्जड,कल्याणी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ.सुनिता मोडक,अभिनेत्री निवेदिता पगार,जगदिश मुळीक,अॕड. चंद्रकांत कचरे,बापूसाहेब पठारे,अॕड.रमेश राठोड,गणेश गोसावी,अनिल टिंगरे,इंजि.पियुष बिरारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मानवाधिकारचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे,पोलिस मित्र,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दादा पठारे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर ,कृष्णकुमार अय्यर,सतिश राठोड व सर्व संघटना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राप्त बहूमानाबध्दल श्री कीशोर मुटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 252