तारापूर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा आगीचे तांडव !


सुरक्षा सप्ताहा कागदावरच
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Mar 2024, 8:15 AM
   

(संतोष घरत) बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पाम ग्रामपंचायत हद्दीत सातपाटी पोलीस ठाणा अंतर्गत ॲटको इंटरियर  - भुखंड क्रमांक- ७५/३ A या कारखान्याच्या पत्रा गोदामाला आज संध्याकाळी ६:३० च्या सुमारासआग लागली होती .आगीमध्ये कोणतीही जीवित हाणि झाली नसली तरी कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
          ॲटको इंटरियर कारखान्यात मालकाने कामगारांच्या व कंपनीच्या दृष्टिकोनातून कोणतीही सुरक्षा यंत्रणा केली नसल्यामुळे सदर गोदामाला आग लागली असल्याचे कळते.
ह्या गोदामा मध्ये पीव्हीसी कार्पेट व वॉल पेपरची साठवणूक केली होती . गोदाम हा पत्र्याचा असल्याकारणाने त्या गोदामाला आग लागली असून आगीचे नक्की कारण कळू शकले नाही.
   ५३व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ  सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. तसेच कामगाराला त्याच्या कामाच्या वेळेस सुरक्षेची शपथही दिली जाते. हा राष्ट्रीयसुरक्षा सप्ताह सुरू असतानाच ही भयानक आग लागली असून हा सप्ताह फक्त कागदावरच असल्याचे सर्व स्तरावर बोलले जात आहे. तसेच ह्या कारखान्याच्या आजूबाजूला व समोर मोठ्या प्रमाणात कचरा असून साफसफाई नसल्याकारणाने तिथे पुढेही अशी आग लागू शकते यामध्ये दुमत नाही.
           ॲटको इंटरियर कंपनीच्या गोदामाला भयंकर मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न सुरू असून त्यांच्या प्रयत्नाला यश आले असले तरी गोदाम मात्र जळून खाक झाले आहे.

    Post Views:  237


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व