तांदळी गावात अवैध गुटख्याचे कनेक्शन...गांजा शेतीचीही माहिती


तालूकाभर गुटख्याचा पुरवठा
 विश्वप्रभात  27 Jul 2024, 5:44 PM
   

(वेभव‌ हराळ) : श्रीगोंदा - तांदळी दुमाला  येथे अवैध गुटखा विक्री चालू असून हा गुटखा तंबाखू विरोधी तसेच मटका जुगार धंदे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.वाढतच चालला आहे.यामुळे गावातील युवा पिढी व्यसनाधिन तेला बळी पडत आहे. एकीकडे  गावात ग्रामपंचायत सुधारणा जरी करत असली तरी देखील गावचे  पुढील भविष्य धोक्यात आहे. गावातच चालू असणारी देशी अवैध दारूची खुले आम विक्री होत आहे. याचा परिणाम हा गावातील १८ वर्षा खालील मुलांवर होत असताना आढळून येत आहे. जर असेच होत राहिले तर गावातील प्रत्येक नागरिकाला संदेश आहे की आपला मुलगा पण संकटातून बाहेर पडेलच असे नाही त्यासाठी सर्वांनी या विरूध्द पुढे येण्याची आवश्यकता आहे. मी ग्रामपंचायती हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी श्रीगोंदा पोलिस कर्मचारी आणि गावातील पोलिस पाटील यांना हा इशारा देत आहे की, आपण आपल्या गावात अश्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुढील पावले उचलावीत. नाही तर आपण आपल्या दिलेल्या अधिकाराचा वापर  करण्यास असमर्थ असाल   तर आपली पदे  सुद्धा काहीच उपयोगाची नाहीत.या अवैध धंद्याची माहिती गपोलिस पाटील यांनी पोलिसांना देणे हे त्यांचे कर्तव्य नाही काय अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे. युवा पिढी बर्बाद‌ होत असेल‌तर विकासाला काहीच अर्थ नाही असे चिंता गावकऱ्यांना आहे गावातील विकास कामांना गती  प्राप्त केली असली तरी खऱ्या अर्थाने आपण हा गावचा विकास केलेला वाटतं नाही असे स्पष्ट वक्तव्य तांदळी गावचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी केले आहे.  गावातील  गुटखा विक्री थांबवावी. किराणा दुकानदाराला पुडी मागे 2 किंवा 3 रुपये मिळत असतील पण त्यातून गावातील युवा पिढी बरबाद होत आहे.
 या चिंताजनक सामाजिक प्रश्नाचा  विचार करून ही अनधिकृत तंबाखू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा आपली ही माहिती पोलिसांना देऊन कारवाईसाठी बाध्य केले जाईल. 
तांदळी गावात काही शेतकऱ्यांनी गांजच सुध्दा पिकवत असल्याची माहिती  आहे. हा गांजा पिकविण्याची पद्धत आहे अशी मकाचा मध्ये उसाचा आत चारी बाजूंनी ऊस मका आणि आत फुलतोय गांजा. गांजा उगवला जाणारे ठिकाण हराळ वस्ती, तरटे वस्ती, भोस वस्ती, अजून बरेच ठिकाणे आहेत या मध्ये 5 किलो इतका माल हा शेतकरी उगवतो अशी माहिती आहे.  या चिंताजनक सर्व सामाजिक प्रश्नाचा  विचार करून अनधिकृत तंबाखू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा आपली ही माहिती पोलिसांना देऊन कारवाईसाठी बाध्य केले जाईल. आर्थिक हितसंबंधातून दारू दुकाने चालू ठेवणे हा उपक्रम पोलिस खात्याने चालू ठेवला आहे .ही बाब योग्य नसून पोलिसांनी  गावातील सर्व अवैध धंदे बंद करून गांजा शेतीचा सुध्दा शोध घ्यावा अशी मागणी संजय निगडे यांनी केली आहे.

    Post Views:  503


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व