31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जास्तीत जास्त संख्येने अकोला येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा
अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने आवाहन
अकोला :-३१ मे म्हणजेच पुण्यश्लोक ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती दरवर्षी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे अकोला येथे संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने भव्य दिव्य अश्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते त्यासाठी तयारी म्हणून १ महिन्यापासून समाज बांधव आपल्या समितीच्या वतीने तयारीला लागतात ३१ में ला सर्वप्रथम सर्व समाज बांधव प्रमिलाताई ओक हॉल येथे व्याख्यान आयोजित करतात त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते त्यानंतर त्या ठिकाणाहून मुख्य रस्ता असलेला गांधी रोड येथून शोभा यात्रा निघते त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव आपल्या परिवारासह हजेरी लावतात त्या अनुषंगाने
संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजातील लोकांना आवाहन करीत आहेत की जास्तीत जास्त संख्येने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवहान
अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने,प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक केशवराव पातोंड,उद्घाटक अकोला महानगर पालिकेच्या माजी महापौर सौ.सुमनताई श्रीराम गावंडे तर व्याख्याते नारायण खानुमोठे तर विशेष उपस्थिती म्हणून तर स्वागताध्यक्ष म्हणून गोपाल गावंडे यांची उपस्थिती राहणार आहे तसेच मनोज करणकार,दीपक पातोंड,सुहास साबे,ज्ञानेश्वर कवळकार,हे सत्कारमूर्ती राहतील या वर्षी शोभा यात्रा समितीच्या अध्यक्षपदी शुभम कवळकार तर कार्याध्यक्ष सचिन नागे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून शंकर खराटे,विकी लाखे,विशाल दिवनाले,सचिन बचे,गणेश करणकार,विशाल नागे,दिलीप काळे, अभी नवलकार,यांची नियुक्ती करण्यात आली महासचिव म्हणून प्रशांत नागे,सूरज पातोंड,गोलुभाऊ घटाळे,योगेश ढेंगे,संतोष कात्रे,महादेव लहाले, वासू पुंडे,संतोष कात्रे,दिलीप गव्हाले,अनिकेत कवरकार,राजेंद्र घोंगे,कैलास घोंगे ,राम तीतुर,दिनेश डांगे,ज्ञानेश्वर पाचपोहे,अंकुश चोपडे,शिवदास घुले यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा राजेश दिवनाले,श्रीकांत चिकटे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अकोला जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 159