हिंगणघाट येथे स्व.गोपीनाथजी मुंडे पुण्यतिथी


लोकस्वातंत्र्यचे किशोर मुटे कार्यक्रमाचे अध्यक्ष
 संजय देशमुख  2022-06-05
   

हिंगणघाट:- हिंगणघाट येथे तुकडोजी वार्डमधील गजानन महाराज मंदिर सभागृहात वर्धा जिल्हा वंजारी सेवा संघाच्या वतीने लोकनेते *स्व. गोपीनाथजी मुंडे* पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय समाजाभिमुख संघटनेचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख व अ.भा.ग्राहक परिषदेचे वर्धा जिल्हा संघटक श्री कीशोर मुटे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता‌.याप्रसंगी
 मा. तुकारामजी मुंडे, अशोकराव साठे, प्रकाशराव कहुरके, प्रमोदजी मुंडे, शिवाजीराव आखाडे, सुपारे काका व जिल्हाध्यक्ष महेन्द्र घुले यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पार पडलेल्या श्रद्धांजली सभेत वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र घुले, अशोकराव साठे, शिवाजीराव आखाडे, प्रमोद मुंडे, प्रमोद नव्हाते, गजानन साळवे, शिवकुमार घुले, सचिन नव्हाते, सौ. रविला आखाडे, अनिल कानकाटे, मारोती साठे, खांडरे सर व सौ. हेमलता घुले यांनी स्व.मुंडेंच्या कार्याचा गौरव करून सर्वांनी त्यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली‌.
                ओबीसी आरक्षण जातिनिहाय जनगणना व केंद्राच्या सूचित विमुक्त भटक्या जातीचा समावेश करणे हीच खरी मुंडे साहेबांना श्रद्धांजली ठरेल, यासाठी संघर्ष करुन यश आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी समाजाने एकजुटीने राहणे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन संघाचे विदर्भ सरचिटणीस श्री प्रमोद मुंडे यांनी यावेळी केले. श्री किशोर मुटे यांनी अध्यक्षिय भाषणातून संबोधन करताना मुंडेसाहेब हे फक्त वंजारी समाजाचे नेते नव्हते तर अठरापगड जातीचे बहुजनांचे लोकनायक नेते होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही वंजारी समाजावर येऊन पडलेली मोठी जबाबदारी आहे. तरी वंजारी समाजातील लोकांनी एकजूट दाखवून संघर्षातून समाज घडवणे महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगीतले.
संचालन सौ. सुस्मिता आखाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रचित घुले, शाम मुसळे, लहानुजी साळवे व सौ. सीमा साळवे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर स्व. गोपीनाथजी मुंडे यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास अनेक समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

    Post Views:  169


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व