शिक्षणक्षेञातील अनागोंदी विरोधात उपवास व जागर


(शहिदांना वंदन करून शिक्षक कैलास इंगोले यांना वाहिली सामूहिक श्रध्दांजली)
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Mar 2023, 7:04 PM
   

मूर्तिजापूर - शिक्षण क्षेत्रातील माजलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात शहीद दिनाच्या औचित्याने सिरसो येथील भूमिपुञ सभागृहात उपवास,चिंतन व जागर करण्यात आला.
        मराठी शाळा बंद करणे,शिक्षक-कर्मचा-यांना हक्काची जुनी पेन्शन नाकारणे,पदभरतीबाबत कंञाटी धोरण स्विकारणे यासह अन्य प्रमुख मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधून उपाययोजना सुचविणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
      शाळा बचाव आंदोलनाचे प्रशांत गावंडे, शिक्षक नीतीचे सुरज मेश्राम, निर्भय बनो जन आंदोलनचे संयोजन गजानन हरणे व विमाशिसंघ चे कार्यवाह तथा म.रा.नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष जयदीप सोनखासकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये जागर संपन्न झाला.
     याप्रसंगी गुरूदेव सेवा समितीच्या वतीने सामूहिक जागरण करण्यात आले.सर्वश्री बबनराव देशमुख तालुकाध्यक्ष गूरूदेवा सेवा मंडळ,एजेएफसी पञकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर,स्वप्नील देशमुख 
, नानाभाऊ मेहर,गोवर्धन पाथरे,उत्तमराव पिंजरकर,प्रेमनारायण कैथवास,देविदास चव्हाण,दादाराव ढोक,रामभाऊ खडसे,बंडुभाऊ सांगळुदकर,संतोष पाठक,समाजसेविका रत्नकलाबाई खंडारे,संगीता इंगळे,महादेवराव ढाकरे,माजी नगरसेवक सुरेन्द्रजी वरोकार,मुदस्सीर खान,प्रशांत धनस्कार,रवी देविकर,शरद गणोरकर,विनायक थेटे,नंदकिशोर वाळवे,श्रीकृष्णराव मालधुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

    Post Views:  250


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व