सौ.विमल डोंगरे यांना विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Jan 2024, 8:11 PM
   

अकोला - अकोला तालुक्यातील माझोड गावच्या रहिवासी सौ विमल शिवचरण डोंगरे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांना सन २०२४ चा स्वामी विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार श्री सचिन बुर घाटे डॉ. रणजीत सपकाळ  डॉक्टर विनीत हिंगणकर, डॉ. संतोष हुशे, डॉ. अमोल रावणकर  नितीन पाटील व कृष्णा भाऊ अंधारे यांचे हस्ते स्वामी विवेकानंद कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन तर्फे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिल्या जातो.

    Post Views:  200


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व