अकोला गार्डन कल्ब तर्फे बोन्साय संदर्भात कार्यशाळा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Aug 2025, 9:47 AM
पर्यावरणाचा व आरोग्याचा समतोल साधणे व सर्वसामान्यांमध्ये झाडाफुलांची आवड निर्माण करणे याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अकोला गार्डन क्लब तर्फे शहरात दरवर्षी विविध ठिकाणी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाची मोहीम राबविली जाते. तसेच सर्वांना उपयुक्त अशा कार्यशाळेचे सुद्धा आयोजन केले जाते. अशीच एक कार्यशाळा नुकतीच बोन्साय लागवडी संदर्भात संपन्न झाली.
सदरहु कार्यशाळेमध्ये मध्ये बोन्सायची लागवड, निगा, खबरदारी व त्याची जोपासना, याविषयी बोन्साय चे तज्ञ व मागील अनेक वर्षापासून बोन्साय या झाड प्रकारामध्ये रुची ठेवणारे विजय ढवळे आणि अनुराधा ढवळे या दांपत्याने उपस्थित्यांना मार्गदर्शन केलं.
अकोला शहर व नजिकच्या परिसरातील नागरिकांकरिता नुकतीच विषयतज्ञ अनुराधा ढवळे व विजय ढवळे यांच्यामार्फत बोन्साय लागवड, निगा व जोपासना या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. ढवळे दाम्पत्याने प्रात्यक्षिकासह या विषयावर उपस्थितांना योग्य व संयुक्तिक असे सविस्तर मार्गदर्शन केले. आणि या कार्यशाळेत उपस्थितांना त्यांच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देवुन त्यांचे समाधानही केले.
बोनसायची योग्य काळजी घेतली तर बोन्साय अगदी घरातल्या घरात सुद्धा छान उभरू शकतो. अकोला शहरात ज्यांच्या गार्डनमध्ये बोन्साय आहेत असेही बरेच लोक अनुराधा ढवळे यांचं मार्गदर्शन घेत असतात. या कार्यशाळेला सुद्धा बोन्साय लावण्याकरिता उत्सुक असणाऱ्या वृक्षप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी अनुराधा ढवळे म्हणाल्या की बोन्साय हा अतिशय आकर्षक व मनाला मोहून टाकणारा झाड प्रकार आहे. सदरहु कार्यशाळेत अकोला गार्डन क्लब चे उपाध्यक्ष सुधीर राठी, गजानन कोणडलीकर, श्रीकांत कोंडवलीकर, यु. टी. ठाकरे, महाबीजचे प्रफुल्ल लहाने, शरद कोकाटे,प्रकल्प प्रमुख विजय ढवळे, क्लबच्या महिला शाखेच्या अध्यक्षा अनुराधा विजय ढवळे, उपाध्यक्षा अमिता सायानी, सचिव श्याम गोटफोडे, सहसचिव दिनेश पारेख, कार्यकारिणी सदस्य संजय हेडा, संजय आगाशे व व गार्डन क्लबचे अध्यक्ष संजय शर्मा, यांचे सह क्लबचे सदस्य आणि अकोला शहर व परिसरातील नागरिक बहुसंख्येनी उपस्थित होते. यानंतर सुद्धा अकोला गार्डन क्लब तर्फे विविध विषयांवर कार्यशाळा अशाच प्रकारे अकोला शहरात विषय तज्ञांकडून घेण्यात येणार आहेत.तरी अकोला शहर व नजीकच्य परिसरातील जनतेनी बहुसंख्येनी हजर राहून उपरोक्त सर्व कार्यशाळांचा लाभ घ्यावा अशी विनंती अकोला गार्डन क्लब तर्फे करण्यात येत आहे.
Post Views: 87