इंधन बचतीसाठी माझा सुद्धा वापर करा की...हो!!!-तुमची सर्वांची लालपरी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 May 2026, 7:32 PM
   

आज पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील नेते मंडळी उत्सृद प्रतिसाद देत इंधन बचतीसाठी प्रयत्न करत आहे, कुणी दुचाकी घेऊन जात आहे तर कुणी इलेक्ट्रॉनिक - इलेक्ट्रिक गाडी घेऊन शान शौकत नी एसी मध्ये बसून आरामदायक प्रवास करत इंधन बचत करत असल्याचा सुंदर संदेश समाजापुढे समाजमाध्यमातून जगापुढे मांडत आहे कल्पना चांगली आहे पण आज खरच त्यांची आठवण येते ते म्हणजे मा.लोकनेते श्री गणपतराव देशमुख (सलग १२वेळा आमदार)असलेले विधानसभेच्या अधिवेशन साठी सर्व सामान्य लोकांची असणारी लालपरी (एस.टी महामंडळ) च्या बस मधून प्रवास करून अधिवेशनाला उपस्थित राहायचे. खरच गौरवपूर्ण क्षण वाटतोय की एवढा मोठा नेता एक सामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगतोय त्याचा निश्चित अभिमान आहे. आजकाल साधा नगरसेवक सरपंच जरी बनला तर तो व्यक्ती मोठया महागड्या एसी च्या गाडीत आपली शान शौकत मिरवतो. विरोध त्यांच्या आलिशान गाडी घेऊन मिरवतात याचा मुळीच नाही पण तहान लागल्यावर विहीर खोदायची असा प्रकार नक्कीच होतोय आणि ते समजतील लोकांना दिसून येते आहे.
सार्वजनिक जीवनात प्रवास करत असतांना आमची आमची सर्वांची लालपरी एस टी महामंडळ ला सुद्धा प्राधान्य द्या की जेकरून इंधनाची बचत होईलच सोबत तुमच्या सारख्या मोठ्या नेतेमंडळीनी एस टी सोबत प्रवास केला तर निश्चितच एक ब्रँड ॲम्बेसिटर म्हणून होण्याची संधी तुम्हाला भेटेलच सोबत महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्याजाणारी एस टी बस ला एक विशिष्ट सन्मानाची  ओळख पण तुमच्या मुळे भेटेल हे पण तेवढेच निश्चित. आरामदायी आणि सुखकर प्रवासाठी हिरकणी, लालपरी सोबतच ई- शिवाई , ई- शिवनेरी बस सुद्धा उपलब्ध आहे.त्याचा सुद्धा दर्जा वाढेल सोबत एस टी महामंडळ यांच्या उत्पन्नात भर पडण्यात आपला मोठा खारीचा वाटा ठरेल.
जे नेते मंडळी ना आता वेळेवर इंधन बचतीचा "गुरू-घंटाल" साक्षात्कार प्राप्त  झाला आणि आम्ही अशा पद्धतीनी इंधनाची बचत करत आहे ते ढोंगीपण समाजातील सामान्य लोकांना कळत पण बोलत नाही हे ही तेवढं सत्य..!!

- इंजि.शुभम प्रकाशराव बांगडे 
चांदूर बाजार जिल्हा अमरावती 
९९७५८०६४३४
shubhampbangade@gmail.com

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व