अकोला : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा लोकशाही दिन मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.2 मे रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी तीन वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे. याच वेळी दिव्यांगांसाठीही लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींसाठी तक्रारी अर्जासह उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
Post Views: 170