रोटरी क्लब अकोला ईस्ट कडून बी. आर. हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचा पहिला इंटरअँक्ट क्लब


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Aug 2024, 10:50 AM
   

 शाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी, मुलींची  सुरक्षितता, कौशल्य विकास,भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी व उज्वल भविष्यासाठी रोटरी क्लब ऑफ अकोला  ईस्ट च्या अध्यक्षा आणि टीम ने अकोल्यातील नामांकित बी. आर. हायस्कूल मध्ये शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ ला एक नवीन उपक्रम म्हणून "बी आर हायस्कूल इंटरऍक्ट क्लब अकोला"ची स्थापना केली.
        बी.आर हायस्कूलचे माजी विद्यार्थी रोटेरियन अजय सेंगर आणि रोटे.शाम गोटफोडे, रोटरी क्लब अध्यक्षा पूनम अशोक मुंदडा यांनी संस्थेचे प्रिन्सिपॉल श्री  देशपांडे यांच्या शी चर्चा करून रोटरी संलग्न  इंटरऍक्ट क्लब बाबत सविस्तर माहिती दिली. संपूर्ण भारतात एकूण 14,911इंटरऍक्ट क्लब आहेत त्याचे एकूण सदस्य ३,42 , 653 आहेत. त्यात आपल्या क्लब ची भर पडली.जगामध्ये 145 देशात इंटरऍक्ट क्लब कार्यरत आहेत.
            १२ ते १८ वयोगटातील मुला मुली पैकी बी .आर. हायस्कूल इंटरअॅक्ट क्लब अकोलाच्या अध्यक्षपदी श्री केशव मालवे उपाध्यक्ष रसिका शिरसाट म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारणी मध्ये आस्था साहू, ईश्वर बनसोड ,वीर खडसे, रोहन इंगळे ,अंकिता रेवेकर, प्रतिक्षा भोजने ,समृद्धी निखाडे, नंदिनी नरवाडे, दशरथ शिरसाट ,कार्तिक दाभाडे, कोमल तेलगोटे ,अंजली मेहरे, गौरी उन्हाळे ,यांचा समावेश करण्यात आला
    नवनिर्वाचित बी आर हायस्कूल इंटरऍक्ट क्लबच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट च्या अध्यक्षा सौ पूनम अशोक मुंदडा,  सचिव रोटे.रमण राठी, प्रोजेक्ट सचिव रोटे.मनोज मालोदे, रोटे, अजय सेंगर, रोटे .श्याम गोटफोडे ,रोटे. ब्रिजमोहन चितलांगे, रोटे.मनोहर विरवाणी,रोटे. अशोक मुंदडा, रोटे. संजय तडस, रोटे.संजय हेडा, रोटे.काजल राजवैद्य राधा कासट,प्रतिक झाडे शाळेचे प्राचार्य देशपांडे सर आणि स्टाफ तथा रोटेरियन उपस्थित असल्याचे रोटरीयन विजय बाहाकर कळवितात.

    Post Views:  119


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व