प्रामणिक सेवाभावी वाटचालीने लोकस्वातंत्र्यसाठी अनेक हात पुढे येतील - निकेश गुप्ता
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५९ वा पत्रकार मासिक विचारमंथन व सन्मान समारंभ संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Jul 2026, 9:45 AM
विदर्भ चेंबर्सचे निकेश गुप्ता,सिध्दार्थ रूहाटिया कृषी पुरस्कार विजेते डॉ.हेमंत देशमुख,विठ्ठल माळी,पत्रकार आतिश सोसे सन्मानित
अकोला - पत्रकार आणि समाज कल्याणाची पारदर्शक सेवाभावी वाटचाल आणि प्रामाणिक भावनांच्या निरंतर उपक्रमांमुळे लोकस्वातंत्र्यच्या चळवळीचा प्रवाह अधिक अधिक समृध्द करण्यासाठी भविष्यात अनेक हात पुढे येतील.प्रामाणिकता आणि पारदर्शकतेची किंमत निश्चितच होत असते,त्यातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे नावलैकिक भारतभर सिध्द होईल.असे प्रतिपादन विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग,व्यापार क्षेत्रातील अग्रेसर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी केले.त्यांनी यावेळी स्व.ब्रिजलाल बियाणी यांनी स्थापन केलेल्या विदर्भ चेंबर्स या अग्रेसर संस्थेचा पसारा,व्यापाऱ्यांना न्याय,मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांची विस्तृत माहिती दिली.
पत्रकार महासंघाचा ५९ वा नियमित मासिक विचारमंथन मेळावा व मार्गदर्शन व सन्मान समारंभ जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे रविवारी संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यधक्षिय मनगतातून ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ चेंबर्सचे उपाध्यक्ष,विठ्ठल ऑईल मिलचे संचालक सिध्दार्थ रूहाटिया,तर साहित्त्यिक, पत्रकार,शैक्षणिक सेवाव्रती आतिश सोसे,वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार विजेते डॉ.हेमंत देशमुख,शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते विठ्ठल माळी,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगेबाबा व महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले,देशातील शहिद जवान,कारगील शहिद,अत्त्याचारग्रस्त महिला,दिवंगत पत्रकार, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी व आपत्ती आणि अपघाग्रस्त बळींना याप्रसंगी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.सभासदांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.संजय एम.देशमुख यांनी प्रास्ताविकातून लोकस्वातंत्र्यच्या राज्यभरातील उपक्रमांबाबत माहिती दिली.
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष निकेशजी गुप्ता,उपाध्यक्ष सिध्दार्थ रूहाटिया यांना निवडीबध्दल तर डॉ.हेमंत देशमुख यांना वसंतराव नाईक कृषी भूषण तथा विठ्ठल माळी पाटील यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराबध्दल सन्मानचिन्ह,शाल देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षण, सामाजिक,साहित्त्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अग्रेसर योगदानाबध्दल आनंदी गुरूकूल च्या प्रा.आतिश सोसे यांनाही सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सिध्दार्थ रूहाटिया यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अधिक नेत्रदिपक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून विठ्ठल उत्पादने आणि त्याला महाराष्ट्र व ईतरत्र मिळत असलेल्या प्रतिसादाबध्दल माहिती दिली.प्रसंगी प्रा.आतिश सोसे यांनी महाराष्ट्रातिल लोकांनीच भव्यदिव्य घडविल्याचा ईतिहास सांगून, लोकस्वातंत्र्य आणि त्या चळवळीला लाभलेले नेर्तृत्वाच्या क्षमतांचा परीचय दिला. डॉ.हेमंत देशमुख,विठ्ठल माळी,पाटील,बुढन गाडेकर,विजय केंदरकर यांनीही मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार,जया भारती-इंगोले,संदिप देशमुख, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,प्रा.डॉ.अशोक शिरसाट,सुरेश पाचकवडे,वसंतराव देशमुख,संतोष धरमकर,नारायणराव बुढन गाडेकर,अजय वानखडे,उपस्थित होते.अॕड अक्षय खाडे,आॕड संकेत देशमुख विनय टोले,पंजाबराव राम पाटील,श्रीकृष्ण माळी,दिपाली बाहेकर,सुरेश तिडके,राजाभाऊ देशमुख,नखरायढराव अंधाराला अशोककुमार पंड्या,अनिल मावळे,अनिल केळकर,संतोष मोरे,केळकर,गणेश मुळे,अजय वानखडे, ना.मा.मोहोड,फुलचंद मौर्य,कैलास टकोरे,अजय वानखडे,दिपक शिरसाट,नितीन लोडम,नरेंद्र देशमुख,नितीन गवई,मनोज भगत,अनिल मावळे,ऐजाज अहमद खान,व असंख्य पत्रकार-सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती- इंगोले तर आभारप्रदर्शन अनिल मावळे यांनी केले
Post Views: 157