अकोल्यात ११ नोव्हेंबरपासून सामर्थ्य व्याख्यानमाला


अकोलेकरांना वैचारिक मेजवानी मिळणार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Nov 2022, 7:33 PM
   

अकोला : दि बेरार जनरल एज्युकेशन साेसायटी व सामर्थ्य फाउंडेशनच्यासंयुक्त विद्यमाने ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत नामावंत व्याख्याते सहभागी होणार असून या माध्यमातून अकोलेकरांना वैचारिक मेजवानी उपलब्ध होणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेल्या सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून बेरार संस्थेच्या सहकार्याने सामर्थ्य व्याख्यानमाला आयोजन करण्यात आली आहे. शहरातील श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘परिस्थिती आज आणि उद्या’ या विषयावर गुंफले जाणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्युकेशन सोयायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ज्ञ ॲड. मोतीसिंह मोहता उपस्थित राहणार आहेत. द्वितीय पुष्प ‘शहरी नक्षलवाद - प्रचार आणि वास्तव’ या विषयावर नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नक्षलवादाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे हे गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्युकेशन सोयायटीचे मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी राहणार आहेत. व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प ‘ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हाने, वीज ग्राहकांवरील परिणाम व त्यांची भूमिका’ या विषयावर गुंफले जाईल. यावेळी महावितरणचे संचालक (वाणिज्य) तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यान देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट उपस्थित राहतील. या व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘बेरार’चे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी, सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, सहसचिव सुर्यकांत बुडखले, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगांवकर, सल्लागार ॲड.डॉ.दीपक दामोदरे, नितीन डोंगारे, प्रा.डॉ.अशोक सोनोने, कायदेविषयक सल्लागार ॲड. संतोष भोरे, विषय तज्ज्ञ डॉ.श्रीकांत उखळकर, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, किरण चौक, श्रीराम देशपांडे, दिनेश चंदन, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, नकुल राठी, प्रकाश जाधव, सुधीर धुळधुळे, मुकुंद देशमुख, मिलिंद शनवारे, समाजमाध्यम समन्वयक प्रा.दत्तराज विद्यासागर आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

    Post Views:  217


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व